Breaking News

शेतकऱ्यांना संकटकाळात फक्त शिवसंग्राम मदतीला तत्पर असते - तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळेरुई येथे शिवसंग्राम किसान आघाडी व सावा सिड्सकडून मोफत बी - बियाणे वाटप
बीड  : शिवसंग्राम किसान आघाडी, सावा सीड्सच्या संयुक्त विद्यमाने बी बियाण्यांचे मोफत वाटप सध्या बीड तालुक्यातील विविध गावात होत आहे. बीड तालुक्यातील रुई येथे शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे यांच्या उपस्थितीत गहू, हरभरा व भेंडीच्या बियाण्याचे वाटप करण्यात आले. 


यावेळी आ विनायक मेटे यांच्या सूचनेवरून शिवसंग्राम संकटकाळात फक्त शिवसंग्राम तत्पर असल्याचे नवनाथ प्रभाळे म्हणाले. रुई या गावाप्रमाणेच लिंबा(रुई) येथे देखील बियाण्याचे मोफत वाटप करण्यात आले आहे.
   शिवसंग्राम किसान आघाडी व सावा सिड्सच्या संयुक्त विद्यमाने शेकडो शेतकऱ्यांना गहू, हरभरा, भेंडी, वाल, चाऱ्याची बाजरी आदींचे बी बियाणे मोफत वाटप करण्यात येत आहे. आ विनायक मेटे यांनी शेतकऱ्यांसाठी सुरु केलेली चळवळ हि अत्यंत गरजेची असून अडचणीच्या काळात आमदार मेटे साहेब शेतकऱ्यांसाठी धावून येत आहेत, कोरोना, अतिवृष्टी मध्ये शेतकऱ्यांना एकीकडे सरकार मदत करत नाही मात्र काही अंशी का होईना शिवसंग्राम मदतीला पडत असल्याचे तालुकाध्यक्ष नवनाथ प्रभाळे म्हणाले. यावेळी शिवसंग्राम नेते तथा वाटप कार्यक्रमाचे आयोजक नानासाहेब कडबाणे, पंडित माने, यांच्यासह शिवसंग्राम पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होते. No comments