Breaking News

लॉक डाऊन नंतर आज केज ४२ माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे वर्ग सुरू



सोशल डिस्टन्सिंग व वैक्तिक स्वच्छता व निर्जंतुकीरकण आणि शिक्षकांची कोरोना तपासणी करूनच प्रवेश

गौतम बचुटे । केज 

तालुक्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक वर्गांच्या एकूण ८७ शाळापैकी आज ज्या शाळेतील शिक्षकांची कोरोनाची तपासणी झालेली आहे आणि शाळांचे निर्जंतुकीकरण झालेले आहे. अशा तालुक्यातील ४२ शाळांचे वर्ग सुरू करण्यात आले असल्याची माहिती प्रभारी गटशिक्षणाधिकारी सुनील केंद्रे यांनी दिली. मात्र कोरोना बाबतचे दक्षता घेऊन वर्ग सुरू करण्यात आले असले तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती मात्र अत्यंत तूरळक आहे. 

लॉक डाउन नंतर सुमारे आठ महिन्या नंतर शाळेचा पहिला दिवस असल्याने शाळेच्या परिसरात तुरळक विद्यार्थी उपस्थित असून अनेक पालक रिस्क घ्यायला तयार नाहीत.


No comments