माहेश्वरी मंडळाच्या अध्यक्षपदी करवा तर सचिवपदी बाहेती
माहेश्वरी प्रगती मंडळाची कार्यकारिणी जाहीर
बीड : येथील माहेश्वरी प्रगती मंडळाच्या अध्यक्षपदी गंगाबिशन करवा तर सचिवपदी रमण बाहेती यांची सर्वानुमते निवड झाली.
मंडळाची रविवारी बैठक झाली मावळते अध्यक्ष विजय कासट यांनी अहवाल वाचन केले तर प्रभारी सचिव राजेंद्र सारडा यांनी मनोगत व्यक्त केले त्यानंतर पुढील दोन वर्षासाठी नूतन कार्यकारिणी निवडण्यात आली.
या कार्यकारिणीत अध्यक्ष गंगाबिशन करवा व सचिव रमण बाहेती यांच्यासह उपाध्यक्ष नंदकिशोर जेथलिया, सहसचिव सुरेंद्र कासट, कोषाध्यक्ष जुगल किशोर बियाणी, जनसंपर्क अधिकारी बालकिसन बियाणी यांचा समावेश आहे. यावेळी नूतन अध्यक्ष गंगाबिशन करवा यांनी मनोगत व्यक्त केले ते म्हणाले 1998 पासून माहेश्वरी प्रगती मंडळ आपले सामाजिक योगदान देत आहे . माहेश्वरी समाजाचा दिवाळी पाडवा स्नेहमिलन सोहळा, गुणवंत विद्यार्थी सत्कार, रक्तदान तसेचआरोग्य तपासणी, मुळव्याध प्लास्टिक सर्जरी शिबीर ,वृक्षारोपण, गणितज्ञ गौरव भंडारी यांचे मार्गदर्शन असे विविध उपक्रम आतापर्यंत मंडळाने राबवले आहेत. भविष्यातही समाजाभिमुख उपक्रम राबविण्यात येतील असे करवा म्हणाले. बैठकीचे सूत्रसंचालन सुरेंद्र बजाज यांनी केले रमण बाहेती यांनी आभार मानले.
No comments