Breaking News

फटाकेमुक्त दिवाळी साजरी करुन गोरगरिबांना अनाथांना फराळ वाटप-दत्ता वाकसेबीड : यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे खूप मोठ्या प्रमाणात गरिबांना कष्टकरी अनाथ असलेले लोकांना यावर्षी फटाकेमुक्त  दिवाळी साजरी करून  कष्टकरी कामगार अनाथ यांना दिवाळीच्या फराळाचे वाटप करून त्यांना देखील आपण ज्या पद्धतीने दीपावली साजरी करतो त्या पद्धतीने आपण वस्तू कपडे फराळ दीपावलीच्या सणामध्ये मध्ये असलेल्या वस्तू वाटप करून त्यांना देखील आपल्यामध्ये सामावून घ्यावे.

त्यामुळे त्यांनादेखील या दिवाळी मध्ये आपल्यामुळे आनंद निर्माण होईल त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण त्यामुळे यावर्षी दीपावलीच्या निमित्ताने अनाथ ग्रह अनाथालय त्याचबरोबर अपंग एचआयव्ही ग्रस्त यांना हे दिवाळीमध्ये आपण सर्वजण मिळून आनंद मिळून देऊया असे प्रसिद्धीपत्रक धनगर समाज संघर्ष समिती निष्ठावंत बीड जिल्हाप्रमुख दत्ता वाकसे यांनी दिले आहे पुढे दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात ते म्हणाले की गेल्या आठ दहा वर्षांपासून वंचित कष्टकरी कामगार त्याचबरोबर एचआयव्हीग्रस्त अपंग यांना फराळाचे वाटप करत आहे त्यामुळे आपले कुटुंब समजून अनाथांना आपण जो आनंद मिळवून आनंदाने साजरी करतो त्याचप्रमाणे त्यांना देखील त्या ठिकाणी आपल्या छोट्याशा आनंदातील  छोटा  आनंद त्यांना देखील दयावा यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे दीपावली साजरी करत असताना मुक्त साजरी करावी कारण त्यामुळे कोरोना विषाणू हा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे फटाक्याचे जास्त प्रमाणात वापर ना करता फटाकेमुक्त दिवाळी साजरी करावी असे देखील वाकसे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.No comments