Breaking News

बीडच्या आरटीओत पासिंग करिता वहान निरिक्षका कडून वहान मालकांची आर्थिक पिळवणूक

आशिष सवाई । बीड

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय बीड मध्ये वाहनांचे योग्यता प्रमाणपत्रा करीता वहान मालकांची वहान निरिक्षका कडून प्रचंड प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत आहे. रितसर आॅन लाइन तारिख घेऊन  ही अडवणूक करण्यात येत असल्याने सामाजिक कार्यकर्ते अॅड. बक्शु अमीर शेख यांनी वहान मालकासह निवासी जिल्हाधिकारी बीड यांना आज भेटून निवेदनाद्वारे वहान मालकांच्या व्यथा मांडल्या.

   

परिवहन वर्गातील मालवाहतूक वाहनांना दर वर्षी आर. टी. ओ. कडून योग्यता प्रमाण पत्र घ्यावे लागते. प्रत्येक वहानं मालकाला आॅन लाइन  अर्ज करुन शासकीय फी भरावी लागते. साधारण एक ते दिड महिना नंतरच्या तारखा पासिंग साठी मिळतात. अश्याच 02 नोव्हेंबर च्या तारखांच्या मालवाहतूक वाहने नियमानुसार पासिंग ट्रॅक वर हजर झाली. पंरतु वहान निरिक्षक  गैरहजर राहील्याने 02 नोव्हेंबर ला वाहनांची योग्यता प्रमाणपत्रा करीता तपासणी करण्यात आली नाही. ती वाहने रात्रभर ट्रॅक वरच थांबली. 03 नोव्हेंबर ला त्या वाहनांची तपासणी करण्यास वहान निरिक्षकांनी नकार दिला व परत नवीन तारिख घेण्यात यावी असे वहान मालकांना सांगितले. जे अन्याय कारक होते. वहानं मालकांना या प्रकारे त्रास देऊन आर्थिक पिळवणूक करण्याचा नवीन मार्ग वहान निरिक्षका कडून अवलंबिले जात असल्याचे समजते.

 

सदरिल बाबींची माहिती प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय कोठूळे यांना फोन द्वारे देण्याचा प्रयत्न झाला पंरतु त्यांनी फोन स्विकारला नाही. म्हणून वहान मालकांनी अॅड. बक्शु अमीर शेख यांच्या नेतृत्वाखाली निवासी जिल्हाधिकारीनां भेट घेऊन निवेदन देऊन दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली.No comments