Breaking News

ऊर्जा विभागाच्या एससीबीसीअंतर्गत भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या उमेदवारांसंदर्भात २४ तारखेला ऊर्जामंत्री व एमडींसोबत बैठक - आ विनायक मेटे


मुंबई  : ऊर्जा विभागाच्या स्थापत्य अभियंता, उपकेंद्र सहाय्यक व विद्युत सहायक या पदांकरितांची निवड प्रक्रिया पूर्ण झाली आहे, परंतु त्यांना अद्यापी नियुक्ती देण्यात आलेली नाही. या विषयावर ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंत्रिमंडळामध्ये चर्चा करून भरती प्रक्रिया पूर्ण झालेल्या उमेदवारांना नियुक्त्या मिळाव्यात यासाठी निर्णय घेतला गेला, एससीबीसी मधील मराठा समाजाच्या उमेदवारांना मात्र यातून वगळण्यात आलेले आहे असे परिपत्रक महावितरणने प्रसिद्ध केले आहे. 

   या विषयासंबंधी शिवसंग्राम संस्थापक अध्यक्ष आ विनायक मेटे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याशी ४ ते ५ वेळा फोनवर चर्चा केली, यामध्ये १ वेळा एमडी असीम गुप्ता यांच्याशी देखील आ विनायक मेटे हे बोलले, 'मराठा समाजातील एससीबीसी मधील उमेदवारांना नियुक्ती द्यावी असा आग्रह शिवसंग्रामने धरला तेव्हा ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी स्पष्ट शब्द दिला कि, "मी कुणालाही(ज्यांची निवड झाली आहे) अशा उमेदवारांना बाहेर ठेवणार नाही, सर्वांना नियुक्ती देणार आहे, काही कायदेशीर प्रक्रियेसाठी आम्ही गुप्तता पाळत आहोत". 

  याबाबत आ विनायक मेटे यांनी ऊर्जामंत्र्यांनी परवा दि १८ नोव्हेंबर २०२० रोजी पत्राद्वारे या विषयाच्या अनुषंगाने बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार दि २४ नोव्हेंबर रोजी मंत्रालयात बैठकीसाठी ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत तसेच एमडी असीम गुप्ता यांचे बोलावणे आले असून हि बैठक त्या दिवशी दुपारी होणार आहे. याबाबतच निरोप आ विनायक मेटे यांना काल रात्री फोनद्वारे ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी दिला आहे.


No comments