Breaking News

मातोश्री'वर धडकणाऱ्या मशाल मार्चचा अटकाव करण्यासाठी शिवसंग्राम कार्यकर्त्यांना नोटिसा

राज्य सरकारची पोलिसांमार्फत दडपशाही; मराठा समाजाचे प्रश्न दाबून टाकण्याचा प्रयत्न  

मराठा आरक्षण विद्यार्थी परिषदेच्या आयोजनाबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात १५० ते २०० जणांवर गुन्हा दाखल 

बीड : विद्यमान महाविकास आघाडी सरकार आपली दडपशाहीची भूमिका निरंकुशपणे राबवत असून मराठा समाज आपल्या हक्काच्या मागण्या देखील करू शकणार नाही यासाठी साम-दाम-दंड-भेदची भूमिका घेत आहे. आज मुंबई येथे मराठा क्रांती मोर्च्याकडून मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान मातोश्री वर आयोजित करण्यात आलेल्या मशाल मार्चला शिवसंग्राम ने पाठिंबा दिलेला आहे. या मार्चला बीड येथून उपस्थिती दर्शवू नये यासाठी जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांना पोलीस विभागाकडून नोटीस काढण्यात आली आहे. याबाबत मराठा समाजात प्रचंड संताप निर्माण झाला असून राज्य सरकार मराठा समाजाच्या विरोधात कट कारस्थान रचत असल्याची भावना समाजात निर्माण होत आहे. 

     

राज्य सरकारने पोलिसांमार्फत दडपशाही करण्यासाठी नोटीस तर काढलीच आहे शिवाय परवा बीड येथे झालेल्या मराठा आरक्षण विद्यार्थी व युवक परिषदेच्या आयोजनाबाबत भारतीय संग्राम परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर कोलंगडे, शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे, राजेंद्र आमटे, सुदर्शन धांडे, धनंजय गुंदेकर तसेच परिषदेचे प्रमुख पाहुणे सिए बी बी जाधव, निमंत्रक अशोक सुखवसे, राहूल टेकाळे यांच्यासह १५० ते २०० जणांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आज होणाऱ्या मशाल मार्चला दडपवण्यासाठी राज्य सरकारची या नोटिसांमार्फत दडपशाही आहे, हा थेटपणे मराठा समाजाचे प्रश्न दाबून टाकण्याचा प्रयत्न आहे, या सरकारला मराठा समाज माफ करणार नसून असली राज्य सरकारची पोलिसांमार्फत सुरु असलेली दडपशाही मराठा समाज कदापिही खपवून घेणार नाही असे शिवसंग्राम जिल्हाध्यक्ष सुधीर काकडे यांनी म्हंटले आहे.


No comments