Breaking News

आष्टी वार्ताहार दिवाळी अंकाने समृद्ध परंपरा जपली - नागराज मंजुळेआष्टी : महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा समृद्धी झाली. यासाठी अनेकांचे योगदान लाभले.संतापासून ही परंपरा सुरु आहे मराठी भाषा गाथा, कथा,कविता, कादंबरी, नाटक या माध्यमातून वाचकासमोर पोचली. वेगवेगळ्या बोलीभाषेतून तिने आपलीे समृद्धी वाढवली. मराठी मुलखात दिवाळी अंकाच्या माध्यमातून साहित्य खूप समृद्ध झाले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांनासुद्धा दखल घ्यावी लागलेली आहे. दिवाळी अंकांनी वाचकांना नेहमीच कथा, कविता ,कादंबरी, नाटक, समीक्षा या माध्यमातून  बौद्धिक खुराक दिलेला आहे.   साप्ताहिक आष्टी वार्ताहार दिवाळी अंक ग्रामीण भागात आपलीे समृद्ध परंपरा जपून आहे .रोप्यमहोत्सव पूर्ण करून आता हा दिवाळी अंक आपली   पुढील वाटचाल करतो आहे.ही अभिनंदनीय बाब आहे असे उद् गार  प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी काढले. 

        

आष्टी येथील साप्ताहिक आष्टी वार्ताहर  दिवाळी अंकाचा प्रकाशन सोहळा पुण्यात पार पडला. या छोटेखानी कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी संपादक उत्तम बोडखे, कवी प्रा.सय्यद अलाऊद्दीन यांनी  दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला .कार्यक्रमाचे प्रास्ताविक कुतूब इनामदार यांनी केले.यावेळी प्राचार्य शेख जे.सी.,सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षक शेख अन्सारभाई ,पत्रकार रामदास जाधव ,आकाश डोंगरे,इंजी.राकेश बोडखे,भीमाजी दळवी उपस्थित होते.


No comments