Breaking News

बालाघाटाच्या डोंगररांगेत वाघबारस उत्साहातजगदीश गोरे । धारुर

धारुर तालुक्यातील बालाघाट डोंगररांगेत वास्तव्यास असलेल्या कोळी महादेव या अनुसूचित(आदिवासी) जमातीच्या लोकांनी दर वर्षीप्रमाणे याही वर्षी वाघबारस मोठ्या उत्साहात साजरी केली.

बालाघाटचे अनुसूचित जमाती संस्कृती संवर्धन प्रतिष्ठान,महाराष्ट्र व समस्त गावकरी यांच्या संयुक्त  धारुर तालुक्यात बालाघाट डोंगर रांगेत मौजे पहाडी पारगाव येथे वाघबारसनिमित्त विविध आदिवासी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत असतात परंतु यावर्षी कोरोनाचा धोका लक्षात घेता वाघाबरसीचा सण एकदम सध्या पद्धतीने परंतु उत्सहात साजरा करण्यात आलाआहे.पहिल्या दिवसी गुराखी मुलांनी घरोघरी जाऊन खिरीचे साहित्य गोळा केले नंतर त्याची खीर करण्यात आली. काही गुराखी  वाघ बनले  तर काही खिरीची रक्षक बनले व खेळ खेळण्यात आला या खेळाच्या दरम्यान  वाघाच्या अंगावर खीर पडली  व वाट बारसं  साजरी झाल्याची  जाहीर झाली तसेच वाघदेवतेचे भगत सुग्रीव वरकले यांच्या हस्ते आदिवासी पद्धतीने वाघदेवतेची पूजा मांडून ,आरती करून , खिरीचा नैवद्य दाखवून व विविध आदिवासी गाणे म्हणून वाघदेवतेला आळवण्यात  आले . त्यानंतर सर्व भक्तांना खिरीचा प्रसाद देणेत आला.

बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त ग्रामस्थांना रोगप्रतिकारशक्तीच्या गोळ्या वाटप करण्यात येणार आहेत.

15 नोव्हेंबर रोजी भगवान  बिरसा मुंडा  यांच्या जयंती निमित्त सर्व ग्रामस्थांना रोगप्रतिकार शक्ती वाढीच्या शासन मान्य आर्सेनिक अल्बम  वाटण्यात येणार आहे असे प्रतिष्ठानचे सहसचिव रामहरी वरकले यांनी सांगितले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून कोळी महासंघाचे अध्यक्ष गोरख(आबा) पूर्णे, कोळी महादेव समाज गुरू महारुद्र महालिंग व इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत तरी समस्त गावकऱ्यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे.

No comments