Breaking News

पॅन्थर सेनेच्या अंदोलनाला यश मंजरथचे पर्यटनस्थळ झाले खुल्ले

पन्नास कुटुंबाचा व्यवसायाचा प्रश्न मार्गी लागला

माजलगाव : तालुक्यातील मंजरथ हे गाव बीड जिल्ह्य़ात खुप प्रसिद्ध आहे. या ठिकाणी पर्यटक येत असतात. परंतु कोराना महामारी मुळे राज्यातील सर्व धार्मिक स्थळे व देवस्थान बंद होते. 

परंतु वंचित आघाडी चे अध्यक्ष अॅड. बाबासाहेब आंबेडकर यांनी पंढरपूर व राज्यातील सर्व धार्मिक स्थळे सुरू करण्यासाठी राज्य व्यापी अंदोलन केले होते. बाळासाहेब अंबेडकराच्या अंदोलनाची दखल महाराष्ट्राचे मुख्यमंञी यांनी घेतली. व दि. 16. 11. 2020. रोजी राज्यातील सर्व पर्यटन सुरू केले आहे. परंतु मंजरथ मधील काही ग्रामस्थांच्या मनमानी कारभाराकडे हे ठिकाण बंद होते, या ठिकाणी पन्नास ते साठ कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो सुशिक्षित बेरोजगार युवकांना हाताला काम मिळते. या हेतूने ऑल इंडिया पॅन्थर सेना युवा जिल्हा अध्यक्ष भिमराव कदम यांनी हे सुरू करण्यासाठी माजलगाव तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर करून हे सुरू जर नाही झाले तर तीव्र अंदोलन करण्यात येईल असा इशारा देताच अवघ्या दोन च दिवसांत हे मंजरथ पर्यटनस्थळ पुर्वी प्रमाणे सुरू झाले आहे. सर्व स्थरातुन ऑल इंडिया पॅन्थर सेना युवा जिल्हा अध्यक्ष भिमराव कदम यांचे अभिनंदन होत आहे.No comments