Breaking News

नगर पंचातीने उभारलेल्या व्यापाऱ्यांच्या शेडमध्ये सत्ताधाऱ्यांनी मांडलं बस्तान ?

 


शिरूर कासारमधील स्थिती, आठवडी बाजारात व्यापाऱ्यांची परवड

सत्तेपुढे... प्रशासनाचं ही चालेना आठवडी बाजारात एकच चर्चा  

शिरूर कासार :  लाखो रुपये खर्च करून व्यापरासाठी येणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी शिरूर कासार नगर पंचायतीने येथील संभाजी चौकात  शेड उभारलं. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या शेडला अतिक्रमणाचा विळखा पडला आहे. यामुळे उन्हातान्हात बसून  व्यापाऱ्यांना आपला माल विकावा लागतोय. एकीकडे व्यापाऱ्यांची परवड होत असताना या शेडला मात्र पार्किंगचे स्वरूप आलं आहे. याठिकाणी नगर पंचायतीच्या कारभाऱ्यांनीच आपलं बस्तान मांडल्याची  चर्चा शहरात होत असून सत्ते पुढं प्रशासनाचं काही चलेना अशी चर्चा सोमवारी आठवडी बाजारात होत होती. 

शिरूर कासार हे तालुक्याचं ठिकाण असल्याने परिसरातील सुमारे २५ ते ३० खेड्यातील ग्रामस्थांचा इथं राबता असतो. तालुका आणि शहर असलेल्या शिरूर कासारचा सोमवारी आठवडी बाजार भरतो. यामुळं शहरात नगर पंचायतीच्या वतीनं बाहेर गावच्या व्यापाऱ्यांना सुविधा मिळावी. यासाठी येथील संभाजी चौकात व्यापाऱ्यांसाठी लाखो रुपये खर्च करुन पत्र्याचे शेड उभारले. मात्र गत सात महिन्यांच्या कालावधीत कोरोना माहामारीमुळे आठवडी बाजारावर बंदी असल्यानं व्यापारी इथं फिरकलेच नाहीत. आता आठवडी बाजाराला परवानगी मिळाल्यानंतर शिरूरच्या बाजारात आपला माल विकण्यासाठी दूर दूरचे व्यापारी येऊ लागले आहेत. परंतु संभाजी चौकातील शेड मधील जागा पार्किंग व अन्य काही साहित्याने व्यापली असून अतिक्रमणामुळे व्यापाऱ्यांना आपला माल उन्हा -तान्हात रस्त्यावर बसून विकावा लागतोय. मात्र नगर पंचायत प्रशासन याकडं दुर्लक्ष का करत आहे, असा सवाल व्यापाऱ्यांमधून  उपस्थित केला जात असताना सत्ते पुढं कोणाचं चालणार अशी चर्चा शिरूरकरांमध्ये होत असून अतिक्रमणावर नगर पंचायत प्रशासन कारवाई करणार आहे, का हाच प्रश्न यानिमित्ताने समोर आला आहे. 

सत्ताधाऱ्यांच्या दबावात प्रशासन..!नगर पंचायतीने सुमारे 25 लाख रुपये खर्च करून शिरूर शहरात आठवडी बाजारात आपला माल विकण्यासाठी येणाऱ्या बाहेर गावच्या व्यापाऱ्यांसाठी शेड उभारले आहे. मात्र नगर पंचायतच्या सत्ताधाऱ्यांनीचं त्याठिकाणी अतिक्रमण केले आहे. शेड मध्ये गाड्या पार्किंग केल्या जात असून सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली येथील नगर पंचातीचे प्रशासन असल्याने या अतिक्रमनांवर कारवाई करण्यास प्रशासन धजावत नसल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर पंचातीचे गटनेते नसीरभाई  शेख  यांनी व्यक्त केली. No comments