Breaking News

शिरूर शहरात राष्ट्रीय वारकरी परिषदेची कार्यकारिणी जाहीर


शिरूर कासार : राष्ट्रीय वारकरी परिषदेची तालुका कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर परिषदेचे तालुकाध्यक्ष ह भ प संतोष महाराज मिसाळ यांनी आपल्या कामाची चुणूक दाखवत राष्ट्रीय वारकरी परिषदेमध्ये माणसे जमा करण्याचे कार्य मोठ्या जोमाने चालवले आहे.

राष्ट्रीय वारकरी परिषदेचे बीड जिल्हाध्यक्ष ह-भ-प संभाजी महाराज शास्त्री यांनी अध्यक्षपदाची धुरा आपल्या खांद्यावरती घेतल्यानंतर परिषदेचे जाळे गावागावांमध्ये पोहोचविण्यासाठी मोठी धावपळ सुरू केली आहे. त्यांनी शिरूर कासार तालुक्याची नुकतीच कार्यकारिणी जाहीर केल्यानंतर तालुका परिषदेच्या पदाधिकारी,कार्यकर्त्यांना कार्याची व्याप्ती वाढविण्यासंदर्भात मार्गदर्शन केले होते. व शिरूर कासार तालुक्‍यात गाव तेथे राष्ट्रीय वारकरी परिषदेची शाखा संकल्प जाहीर केला होता. या संकल्पाची स्पुर्ती  करण्यासाठी शिरूर कासार तालुका अध्यक्ष ह.भ.प संतोष महाराज मिसाळ यांनी मोठे धडाडीने प्रयत्न सुरू चालवले आहेत.त्यांनी या कार्याची सुरुवात  शिरूर शहरापासून केली आहे. या शहरांमध्ये महिला व पुरुष अशा दोन शाखांचे नियोजन करून शहर समितीचे गठन केले आहे. शुक्रवारी या समितीच्या पदाधिकाऱ्यांना सिद्धेश्वर संस्थान येथे जिल्हाध्यक्ष संभाजी महाराज शास्त्री यांना प्रचारन करून त्यांच्या हस्ते पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन कार्याचा शुभारंभ केला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष संभाजी महाराज शास्त्री यांच्यासह, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख शंकर भालेकर,तालुकाध्यक्ष संतोष महाराज मिसाळ, सचिव शाम महाराज राख,  नवनाथ महाराज सानप, अर्जुन महाराज मिसाळ, अविनाश महाराज मोरे , पत्रकार दिगंबर गायकवाड आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

तसेच यावेळी राष्ट्रीय वारकरी परिषदेची शहर कार्यकारणी जाहीर करण्यात आली. यामध्ये शहर अध्यक्षपदी भारुड सम्राट हभप भाऊसाहेब महाराज हरिदास , उपाध्यक्ष हभप राम महाराज क्षिरसागर , सचिव हभप जीवन महाराज महानुभव,सह सचिव अमोल राहिंज, सल्लागार ऍड विनायक जायभाय, संपर्क प्रमुख नवनाथ बडे, कार्यवाहक अशोक काका गायकवाड, प्रसिद्ध प्रमुख पत्रकार अशोक भांडेकर , मार्गदर्शक पत्रकार बाळकृष्ण मंगरुळकर , उप मार्गदर्शक कमलाकर वेदपठाक, समन्वयक ज्ञानदेव बडे, उप सल्लागार हनुमंत शिंदे सर, कार्याध्यक्ष मधुकर खामकर, सदस्य रावसाहेब कांबळे, भगवान आघाव, रमेश सानप, दादा तळेकर, नामदेव थोरात,पांडुरंग पवार आदित्य आरेकर, प्रकाश क्षिरसागर यांची नियुक्ती करण्यात आली तर महिलांमध्ये शहर अध्यक्षपदी मुक्ताबाई हरिदास,उपाध्यक्ष अश्विनी भांडेकर, सचिव प्रियंका महानुभव, सह सचिव पद्मावती घोरपडे,संपर्क प्रमुख मीनाताई कोळी, मार्गदर्शक शालनबाई तळेकर, उप मार्गदर्शक मिनाबाई गायके, सल्लागार सुनीता शेटे, सह सल्लागार चंदाताई थोरात,प्रसिद्ध प्रमुख शरदाताई गाडेकर, कार्यवाहक आशाताई सव्वाशे, सदस्य बालुताई साळवे, अशाबाई कातखडे, निर्मला सानप, चंद्रकला महानुभव यांची निवड झाली आहे.


No comments