Breaking News

नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परिक्षाचे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्यास सुरूवात


जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी व पालकांनी संधीचा फायदा घ्यावा

परिक्षा प्रमुख दिलीप इंगळे व प्राचार्य आर.नागभुषणम यांनी केले आवाहन.

जगदीश गोरे । वडवणी 

नवोदय विद्यालय प्रवेश चाचणी परीक्षांचे ऑनलाइन प्रवेश अर्ज भरण्यास दिनांक 22/10/2020 पासून सुरुवात झाली आहे.ग्रामीण व शहरी भागातील जास्तीत विद्यार्थ्यांना उच्च दर्जाच्या शिक्षणाचा  फायदा व्हावा.यासाठी केंद्रीय शासनाने ही योजना सुरू केलेली आहे. प्रवेश अर्ज भरण्याची अंतिम तारीख 15.12.2020 आहे या संधीचा फायदा बीड जिल्ह्यातील इयत्ता पाचवीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी व पालकांनी या संधीचा फायदा घ्यावा.असे आवाहन नवोदय विद्यालयाचे परीक्षा प्रमुख दिलीप इंगळे सर व प्राचार्य आर.नागभूषणम यांनी केले आहे.

    

 ही परीक्षा दिनांक 10.04.2021 रोजी होणार आहे.या परीक्षेचा प्रवेश अर्ज विनामूल्य नवोदय विद्यालय समितीच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन अर्ज करू शकता हा अर्ज तुम्ही स्वतः सायबर कॅफे वरून,घरच्या लॅपटॉप वरून किंवा मोबाईल वरून ऑनलाईन अर्ज खालील संकेत स्थळावरून भरू शकता.WWW.navodaya.gov.in

navodaya.gov.in/nvs/en/Admission-JNVST/JNVST-Class/ अधिक माहितीसाठी नवोदय विद्यालयाच्या वेबसाईट पहा तसेच सोबत दिलेल्या नवोदय विद्यालय समिती च्या माहिती पत्रकावर माहिती पहा व प्रवेश अर्ज अचूक भरा.व दर्जेदार शिक्षणासह इतर सुविधांचा लाभ जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी व पालकांनी घ्यावा असे आवाहन परिक्षा प्रमुख दिलीप इंगळे, प्राचार्य आर.नागभुषणम यांनी केले आहे.


No comments