Breaking News

उमापूर गटात एकाधीकार शाहीला कंटाळून भाचपाच्या शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश


अमरसिंह पंडित यांनी स्वागत करून दिल्या शुभेच्छा

अविनाश इंगावले । गेवराई  

भारतीय जनता पार्टीचा मजबूत गड असलेल्या उमापूर गटात सक्रीय कार्यकर्त्यांनी काल २० नोव्हेंबर शुक्रवार रोजी उमापूर येथील भाजपाचे आ.पवार यांचे समर्थक ग्रामपंचायत सदस्य तथा उत्कृष्ट संघटन कौशल्य असलेले अझहरभाई इनामदार, बोरीपींपळगाव चे गणेश वडघणे, महादेव कुरुंद, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन भारत पवार यांच्यासह शेकडो उमापूर गटातील भाजपा कार्यकर्त्यांनी रा.कॉ.प्रदेश सरचीटनीस अमरसिंह पंडीत यांच्या नेतृत्वात रा.कॉ.पक्षात प्रवेश केला.

   यावेळी भाजपचे सक्रिय कार्यकर्ते मतीन कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य भास्कर वाडघने, शिवाजी वडघने, भाजपचे सक्रिय कार्यकर्ते योगीराज जाधव, अशोक वडघने, सचिन कोरडे, गोविंद पवार, अमोल वडघने, बाप्पासाहेब वडघने, भागचंद कोरडे, ज्ञानेश्वर वडघने, दत्ता गवारे, दत्ता गवारे, तुकाराम सावंत, दिनकर पानखडे नागझरीचे वाचीष्ट घमाट आदींनी भारतीय जनता पार्टीच्या एकाधिकार शाहीला कंटाळून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरसिंह पंडित व जि. प.चे माजी अध्यक्ष श्री. विजयसिंह पंडित यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अमरसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये कृष्णाई येथे जाहीर प्रवेश केला. अमरसिंह पंडित यांनी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये स्वागत केले.

यावेळी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष संग्राम आहेर, जयदीप औटी, सतिष आहेर, रवी देशमुख, भास्कर महाराज मोटे, अमोल पठाडे, नितीन पवार, अमोल देशमुख, रवींद्र पठाडे, परसराम पवार मिरगावचे माजी सरपंच भाऊसाहेब माखले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोट्या संख्येने उपस्थित होते.

No comments