Breaking News

दीपोत्सव ; सर्पराज्ञीत गाई- वासराचे पूजन करून वसुबारस साजरीशिरूर कासार : गाय वासरांचे पूजन करून वसुबारस साजरी करत दीपोत्सवाची सुरुवात सर्पराज्ञी  उत्साहात करण्यात आली. गायी विषयी कृतज्ञता वक्त करत सर्पराज्ञीतील गौरी-दुर्गा या गाईची वासरासह सृष्टी सोनवणे यांनी मनोभावे पूजन करून दीपोत्सवाची सुरुवात केली.

      गौरी आणि दुर्गा ह्या सर्पराज्ञी तील गाई या गायीच्या दुधावर २४ काळवीटाची पिल्लं, ९ चिंकाराची पिल्लं,११उदमांजराची पिल्लं, ३ सशाची पिल्ले अशी एकूण ४७ निसर्गातील मातृत्वापासून दुरावलेल्या निष्पाप वन्यजीवांच्या पिल्लांना नवजीवन देण्यात सर्पराज्ञीला यश आलेले आहे. खऱ्या अर्थाने मातृत्वापासून दुरावलेल्या या निष्पाप वन्यजीवांच्या पिल्लांच्या या गायी आईच.  या गाईप्रती कृतज्ञता म्हणून काल सायंकाळी सर्पराज्ञी वसुबारस मोठ्या उत्साहात साजरा केला. यानिमित्त गौरी व दुर्गास व तिच्या वासरांचे  सर्पराज्ञीच्या संचालिका सृष्टी सोनवणे यांनी पूजन केले.या गायी  सर्पराज्ञीस दान करणारे क्षितिज हिर्लेकर यांचेही कृतज्ञतापूर्वक स्मरण केले.No comments