Breaking News

शेकापचे बळीपुजन व ठेचा भाकरी आंदोलन होणारच - अँड नारायण गोले पाटील


तहसीलदाराने नोटीस देऊन परवानगी नाकारली

माजलगाव :  तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे विविध प्रश्न प्रलंबित असताना शासन व प्रशासन मात्र दिवाळी साजरी करत आहे, तर दुसरीकडे शेतकऱ्याला दिवाळी साजरी करण्यासाठी पैसे नाहीत शासनाने कापसाची खरेदी अद्याप सुरू केलेली नाही. 

अतिवृष्टीच्या नुकसान भरपाईचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर अद्याप जमा झालेले नाहीत,शेतकरी आत्महत्येचा आकडा हजारोच्या संख्येने वाढत असतानाही शासन शेतकऱ्याच्या हाक्काचा हमीभाव मिळवून देणारे स्वामीनाथन आयोग लागू करायला तयार नाही यासारखे अनेक  शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजेत याकरिता तहसील कार्यालयासमोर शेकापच्या वतीने बलिप्रतिपदेच्या दिवशी बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून ठेचा भाकरी आंदोलन करण्याचे निवेदन तहसीलदार माजलगाव यांना देण्यात आले आहे त्यानंतर थोड्याच वेळात आंदोलन करू नये यासाठी तहसील प्रशासनाने भाई ॲड.भाई नारायण गोले पाटील यांना नोटीस देऊन आंदोलनाला परवानगी नाकारली आसली तरी बळीपुजन व ठेचा भाकरी आंदोलन होणारच आशी भुमिका शेकापाचे आँड भाई नारायण गोले पाटील यांनी घेतली आहे

माजलगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची कापूस खरेदी असेल किंवा अतिवृष्टीमुळे झालेले नुकसानाची नुकसान भरपाई असेल, असे शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असल्याने तसेच यावर्षीच्या दिवाळी वर कोरोना साथ रोगाचे सावट मोठ्या प्रमाणावर असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने ॲड.भाई नारायण गोले पाटील यांनी केली असली तरीही प्रशासनाने मात्र या आंदोलनास परवानगी नाकारलेली आहे, यामुळे शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीत प्रशासनही उदासीन असल्याचे दिसत असुन शेकापाच्या वतिने बळीपुजन व ठेचा भाकरी आंदोलन होणारच आशी भुमिका शेकापाच्या वतिने घेण्यात आली आहे.

शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे प्रशासन आणि सरकार उदासीनतेने पहात असून एकीकडे देशात दिवाळी साजरी होत असताना दुसरीकडे शेतकरी दोन वेळच्या अन्नाच्या शोधात आहे, अंबानी,अदाणी यांना हजारो कोटींची सबसिडी देऊन खैरात वाटप करता, शेतकऱ्याला काहीच न देता त्याचा हक्काचा हमीभाव मिळावा म्हणून स्वामीनाथन आयोगाने केलेल्या शिफारशी नाकारता हा कसला तुमचा न्याय, शासनाने शेतकऱ्यासाठी तत्काळ स्वामीनाथन आयोग लागू करावा.. मला कितीही अडवले, गुन्हे दाखल करण्याची भीती दाखवली तरी, शेतकऱ्या वरती होत असलेला अन्याय खपवून घेणार नाही, हे आंदोलन करणारच असल्याचे  भाई अँड. नारायण गोले पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

No comments