Breaking News

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड. गोविंद फड यांनी केले पाळवदे कुटूंबियांचे सांत्वन

 परळी वैजनाथ :  हेळंब येथील माजी उपसरपंच तथा सेवा सहकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माणिकराव जगन्नाथ पाळवदे यांच्या दुःखद निधनाबद्दल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अँड. गोविंद फड यांनी हेळंब येथील निवास्थानी भेट देऊन पाळवदे कुटुंबियांची त्यांचे सांत्वन केले. तसेच कै. माणिकराव जगन्नाथ पाळवदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली  वाहण्यात आली.

            

तालुक्यातील जेष्ठ राजकिय सामाजीक क्षेत्रातील व्यक्तीमत्व सेवा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माणिकराव पाळवदे यांचे (92) व्यावर्षी दि.27 आँक्टोंबर रोजी  निधन झाले होते.  तालुक्यातील एक मनमिळावू व्यक्तिमत्व असे सर्वपरिचित असलेले माणिकराव जगन्नाथ पाळवदे यांनी हेळंब येथे गावातील प्रत्येक कार्याक्रमात व विविध शैक्षणीक, सांस्कृतिक अनेक कामात त्यांचा सहभाग होता.  माणिकराव पाळवदे यांच्या निधनाने त्यांच्या जाण्याने ग्रामीण भागातील व्यक्तिमत्व हरपला अशा शब्दात गोविंद फड यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. आपल्या मनमोकळ्या स्वभावामुळे माणिकराव पाळवदे हे सर्वांच्या परिचयाचे होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा धर्मापुरीचे सरपंच अँड. गोविंद फडराष्ट्रवादी  काँग्रेसचे नेते दत्ता सावंत, माजी सरपंच बालाजी आंधळे, इंद्रजित होळंबे, निवृत्ती आंधळे इतर नागरिक यांच्यासह पाळवदे  कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी  प्रा.नारायण पाळवदे, प्रा.डॉ.नागोराव पाळवदे, हेळंबचे उपसरपंच राम पाळवदे व पाळवदे परिवार उपस्थित होते.No comments