Breaking News

ऊसतोड कायद्या संदर्भात आ. धस यांनी माथाडी कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांच्याशी केली चर्चा


के. के. निकाळजे । आष्टी 

महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ.बाबा आढाव यांची पुणे येथील बाजार समितीतील अंबर निवासस्थानी आ.सुरेश धस यांनी भेट घेऊन त्यांच्यासोबत कामगारांच्या कायद्याच्या विषयावर चर्चा केली. 

कामगार लढ्याची अभ्यासपूर्ण माहिती घेऊन ज्या पद्धतीने मापाडी व माथाडी कामगारांसाठी कायदा आहे,तसाच कायदा स्थलांतरित ऊसतोडणी कामगारांसाठी होणे गरजेचे असल्याबाबत या अनुषंगाने डाॕ.बाबा आढाव व आ.सुरेश धस यांच्यामध्ये चर्चा झाली.समाजातला शेवटचा माणूस हाच आपल्या कार्याचा केंद्रबिंदू समजून शोषित व वंचितांना न्याय कसा मिळेल. 

यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून संघर्ष चालू ठेवावा असे यावेळी डाॕ.आढाव आ.धस यांना म्हणाले.तसेच आपण ऊसतोड कामगारांच्या हक्कासाठी जो लढा उभारलेला आहे तो अविरत असाच सुरु ठेवा.नक्कीच ऊसतोड मजुरांसाठीची उभारलेली चळवळ त्या कामगारांना न्याय दिल असा विश्वासही डाॕ.आढाव यांनी व्यक्त करीत आ.सुरेश धस यांच्या कामाचे कौतुक केले.


No comments