Breaking News

कृषी पंपासाठी दिवसा जास्त दाबाने विज पुरवठा चालू ठेवा


शिव संघर्ष सामाजिक ग्रुप चे सुरेश पाटोळे यांनी केली उर्जामंत्र्यांकडे मागणी.

बीड : महाराष्ट्रात बिबट्याचा संचार असल्याच्या बातम्या समाजमाध्यमात रोज चालू असून अनेक ठिकाणी शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याचे दिसत आहे. त्यामुळे लहान मुलाबाळासह शेतकऱ्यांमध्ये भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकरिता महावितरण कंपनीने शेतातील वीज पंपाना जास्त दाबाने दिवसा वीजपुरवठा करावा अशी मागणी शिव संघर्ष ग्रुप चे सुरेश पाटोळे यांनी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे केली आहे. 

     

आष्टी तालुक्यातील सुरवडी येथील पं. स. सदस्याचे शेतकरी पती शेतात काम करत असतांना बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले. तसेच किन्ही येथील एका लहान मुलाला उचलून नेले आहे. या घटनेसह महाराष्ट्रातील आजपर्यंत अनेक जिल्ह्यात बिबट्याने हल्ला करून दहशत पसरवली आहे. त्यामुळे शेतकरी रात्रीच्या वेळी शेतात जाण्यास घाबरतात. सध्या रब्बीची पिके पाण्याअभावी करपायला लागल्याने शेतकरी पाणी देण्याचे काम करत आहेत. बिबट्याच्या धास्तीने शेतकरी रात्री शेतात जाण्यास घाबरत आहेत. पाण्याअभावी शेतातील पिके वाळून जात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना रात्रीच्याऐवजी दिवसा वीजपुरवठा करून जास्त दाबाने करावा. अशी मागणी शिव संघर्ष ग्रुपचे सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार सुरेश पाटोळे यांनी केली आहे. यापूर्वी वनविभागाला बिबट्याचा बंदोबस्त करून जेरबंद करावे असेही सुरेश पाटोळे यांनी सांगितले होते. तसेच कोणीही रात्री अपरात्री शेतात जाऊ नये. स्वतःची व कुटूंबाची काळजी घ्यावी असे आवाहन जनतेला केले.

     

महाराष्ट्रात यावर्षी अतिवृष्टी झाल्याने मोठ्याप्रमाणात शेती मालाचे नुकसान झाले होते. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून अनुदान देण्याची मागणी यापूर्वीच मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. परंतु अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही. यासाठी आम्ही महाविकास आघाडीचे सर्वेसर्वा तथा जेष्ठ माझी कृषीमंत्री मा. शरद पवार यांना भेटणार आहोत असेही सुरेश पाटोळे यांनी सांगितले आहे.


No comments