Breaking News

आता तरी परळी नगर परिषदेने एक दिवस आड-पाणी पुरवठा करावा - प्रा पवन मुंडेपरळी : परळी शहरातील नागरिकांना नागापूर धरण भरून ओसंडून वाहत असतांना सुद्धा नियमितपणे न येणाऱ्या पाण्या मुळे नागरिकांना पाण्या साठी एन सणासुदीच्या काळात वन-वन भटकायची वेळ आली आहे तरी न प प्रशासनाने त्वरित परळी शहराला एकदिवस आड पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा अशी मागणी भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.

 

नागापूर धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने मागील तीन वर्षां च्या दुष्काळी कालखंडा नंतर सुदैवाने या वर्षी चांगला पाऊस काळ झाल्याने नागापूर धरण पाण्याने ओसंडून वाहत आहे,तरी सुद्धा परळी नगरपालिकेच्या भोंगळ कारभारामुळे तलावात पाणी असून सुद्धा एन दसरा-दिवाळीच्या सणासुदीच्या काळात लोकांना पाण्या साठी वन-वन फिरावे लागत आहे तरी परळी नगरपालिका प्रशासनाने या बाबींची गंभीर दखल घेऊन शहरात किमान एक दिवस आड पाणी पुरवठा करावा अशी मागणी भाजपा नगरसेवक प्रा पवन मुंडे यांनी केली आहे.


No comments