Breaking News

कपीलधार यात्रा रद्द केल्याने पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी प्रशासनाचे मानले आभार


बीड : कार्तिकी पौर्णिमेच्या दिवशी बीड तालुक्यातील कपीलधार येथे दरवर्षी यात्रा भरते या यात्रेचा लाखोंचा समुदाय एकत्र येतो. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने प्रशासनाने ही यात्रा रद्द केली आहे. हा निर्णय जनहिताचा असल्याचे म्हणत कपीलधार पंचक्रोशीतील नागरिकांनी जिल्हा प्रशासनाचे आभार मानले आहेत.

कपीलधार येथील मन्मथ स्वामींच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह परराज्यातून लाखो भाविक कार्तिकी पौर्णिमे दिवशी येतात. मात्र यावर्षी कोरोनाचे संकट असल्यामुळे ही यात्रा रद्द करावी अशी मागणी कपीलधार पंचक्रोशीतील नागरिकांच्या वतीने करण्यात आली होती. कोरोनाचे संकट लक्षात घेवून प्रशासनानेही ही यात्रा रद्द केली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी यांचे कपीलधारवाडी ग्रामस्थांनी आभार मानले आहेत.


No comments