Breaking News

सेवानिवृत्ती निमित्त अमिनोदीन शेख यांचा सत्कार

 


बीड : येथील पोलिस मुख्यालयातील पोलिस कर्मचारी अमिनोदीन जियओद्दीन शेख हे वयोमानानुसार शनिवारी (दि.३१) सेवानिवृत्त झाले. यावेळी त्यांना बीड पोलिस दलाच्या वतीनं निरोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. 

अमिनोदीन जियओद्दीन शेख यांनी बीड जिल्हा पोलिस दलात १८ वर्ष कर्तव्य बजावले. जिल्ह्यातील तलवाडा, अंमळनेर पोलिस ठाण्यात कार्यरत असताना अत्यंत मनमिळाऊ, संयमी व्यक्तिमत्त्व म्हणून ते ओळखले जाऊ लागले. त्यानंतर त्यांची बदली बीडच्या मुख्यालयात झाली. या- ही ठिकाणी त्यांनी  आपल्या स्वभाव गुणांमुळे सर्वांना आपलेसे केले. 

भारतीय सैन्य दलात अमिनोदीन जियओद्दीन शेख यांनी २१ वर्षे देशाची सेवा केली. दि. ३१ ऑक्टोबर रोजी बीड पोलिस दलातून नियमित  वयोमानानुसार  सेवा निवृत्त झाले. यावेळी त्यांना बीड पोलिस दलाच्या वतीने निरोप देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्यालयातील पोलीस कर्मचारी भावूक झाले होते. कार्यक्रमास रापोनी श्री शेख, राउपपोनी सावरे, एएसआय श्री. वारे, श्री. वणवे, श्री. उगलमुगले, चव्हाण, राहुल वीर, पंकज थिंगले, श्री. कुडके, बाळू खंडागडे,  राहुल ठाकूर, फेरोज पठाण, विष्णू चव्हाण, विकास उजगरे, गुलरेस दुराणी, आदी कर्मचारी उपस्थित होते.
No comments