Breaking News

शहरात अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट ; अरुणोदय मार्केट येथे अवस्थीने केले नियमबाह्य अतिक्रमणाचा प्रताप !परळी : परळी शहरात न.प.च्या हद्दीत अनधिकृतपणे दुकानासमोरील नाली व रस्त्यावरील न.प.च्या हद्दीत अनेक दुकानदारांनी ओठा, फरशी, ग्रील, परवानगी न घेता दुकानाच्या वर लावलेला मोठा बोर्ड व बँनर, नियमबाह्य बांधकामांचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे रस्त्याची रुंदी कमी होऊन रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. तसेच य आवश्यक बँनर, बोर्डामुळे व बांधकामामुळे व्यावसायिकांना व रहदारी करणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. विशेष बाब म्हणजे अरुणोदय मार्केट येथे विवेक अवस्थी यांच्या विरुद्ध न.प.च्या मुख्य अधिकाऱ्यांना या बाबत दि.१०/११/२०२० रोजी लेखी तक्रार दिली आहे. 

   सविस्तर माहिती अशी की, या अनधिकृत बांधकाम व नियमबाह्य बोर्डांमुळे व्यावसायिक परमेश्वर मुंडे यांनी यापूर्वी दि.०५/११/२०२० रोजी शहर पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि.कलम ५०४, ५०६ अन्वये श्री विवेक अवस्थी यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे. परमेश्वर मुंडे हे श्री इन्फोटेक चे संचालक तथा  भगवानबाबा पत्र या साप्ताहिकचे संपादक आहेत. न.प.दिलेल्या तक्रारीत विवेक अवस्थी यांचे ब्लु स्टार एजन्सीज या नावाने दुकान आहे. अवस्थी ने दुकानाच्या समोर अनधिकृत बांधकाम त्यात सार्वजनिक रस्त्यावर ग्रील, वट्टा, पत्र्याचा शेड, ब्लू स्टार कंपनी या नावाने असलेला दुकानाचा मोठा बोर्ड इत्यादी नियमबाह्य अतिक्रमण करून प्रताप केला आहे.

 

जे एम.आर.टी.पी.ऍक्ट १९६६ कलम १५२, १५३ व १५४ चे उल्लंघन करते. तसेच दीड वर्षांपासून परळी न.प.ची कुठलीही बँनर साठी परवानगी न घेता दुकानाच्या वर लावलेला मोठा बोर्ड ज्यामुळे शेजारील दुकान झाकले गेले आहेत. अनेक व्यवसायावर विपरीत परिणाम होत आहे. अनधिकृत बोर्ड काढण्याची विनंती केली असता हुज्जत घालून तुला काय करायचंय ते कर, कुठं जायचं आहे तिथे जा... मी बोर्ड काढत नाही असा विवेक अवस्थीने खोडसाळपणा करत आहे. अशा बाबी परळी शहरामध्ये मोठ्या प्रमाणात होत आहेत. या वरून असे दिसते की, परळी शहरामध्ये न.प.व पोलीस स्टेशनचे सुशासन नसल्यामुळे या सरकारी यंत्रणांचा अतिक्रमण करणाऱ्यांवर वचक राहिली नाही. परमेश्वर मुंडे यांच्या तक्रारीवर प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
No comments