Breaking News

सिद्धेश्वर संस्थानला 'ब' दर्जा द्या ; महेबुब शेख यांची ग्रामविकास मंत्री मुश्रीफ यांच्याकडे मागणी

 

शिरूर कासार : तालुक्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धेश्वर मंदिर संस्थानला 'ब' वर्गाचा दर्जा देण्यात यावे. अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख यांनी राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्री यांना पाठविलेला निवेदनाद्वारे केली. 

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, की शिरूर कासारकरांचे श्रद्धास्थान असलेल्या सिद्धेश्वर संस्थानवर वर्षभर धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.  महिनावारी, वै. संत गोसावी बाबा, संत आबादेव महाराज पुण्यतिथी, अखंड हरिनाम सप्ताह या सारखे विविध धार्मिक कार्यक्रम वर्षभर आयोजित करण्यात येत असून पाच लाख भाविक मंदिरात दर्शनासाठी येतात. या पूर्वी तीर्थक्षेत्राचा 'क' दर्जामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. 

भाविकांची तीर्थक्षेत्रावरील वाढती संख्या पाहता आणि संस्थानवर भौतिक सुविधांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने या संस्थानला तीर्थक्षेत्र 'ब' वर्ग दर्जामध्ये समाविष्ट करून या तीर्थक्षेत्राचा विकास करावा अशी मागणी महेबुब शेख यांनी ग्रामविकासमंत्री मुश्रीफ यांच्याकडे केली आहे. No comments