Breaking News

आ.संदिप क्षीरसागरांनी लक्ष घालताच अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल; दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश

पाटबंधारे विभागात जाळून घेतलेल्या शेतकर्‍याचा मृत्यू

बीड :- पाटबंधारे विभागाने कर्मचारी वसाहतसाठी संपादित केलेल्या जमिनीच्या मावेजा मागणीसाठी जाळून घेतलेल्या शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. घटना घडताच आ.संदिप क्षीरसागर यांनी जिल्हा रूग्णालयात भेट घेत या प्रकरणी दोषी अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदरील शेतकर्‍याचा मृत्यू झाला असून संबंधित दोषी अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात आले असून याबाबत दहा दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहे.

अर्जुन कुंडलीक सोळंके (वय 45 रा.पाली) यांची जमीन पाटबंधारे विभागाने गेल्या काही वर्षापूर्वी कर्मचारी वसाहतीसाठी संपादीत केली होती. पाटबंधारे विभागाने 34 गुंठ्ठे ऐवजी 44 गुंठ्ठे जमीन संपादित केल्याचे सोळुंके यांचे म्हणणे होते. एक तर जमीन परत द्यावी नसता जमिनीचा मावेजा द्यावा अशी मागणी वारंवार त्यांच्याकडून पाटबंधारे विभाग, भूमी अभिलेख, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे करण्यात आली होती. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने सदरील शेतकर्‍याने पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात जाळून घेतले. उपचार दरम्यान सदर शेतकर्‍याचा मृत्यू झाला. याबाबत आ.संदिप क्षीरसागर यांनी दोषी अधिकार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत अशा सूचना घटना घडली की केल्या होत्या. याबाबत शेतकर्‍याच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका घेत आ.संदिप क्षीरसागर यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांच्याशी संवाद साधत सदरील प्रकरण तातडीने निकाली काढण्याची विनंती केली आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

आ.संदिप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी लेखी देण्यास भाग पाडले

पाली येथील शेतकर्‍याने जाळून घेवून आत्मदहन केल्यानंतर शेतकरी स्वाभिमानी संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला. स्वाभिमानी शेतकरी संटनेचे भाई मोहन गुंड, कुलदीप करपे यांच्यासह आदींनी गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी लावून धरली. नातेवाईकांनी जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाहीत अशी भूमिका घेतल्यानंतर आ.संदिप क्षीरसागर यांच्या कार्यकर्त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जावून सदर मयताच्या मुलाच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करून घेतला. त्यानंतर जिल्हाधिकारी यांच्याशी संवाद साधत 10 दिवसात याबाबत योग्य ती कार्यवाही करून अहवाल सादर करण्यात येईल. सदरील प्रकरण तात्काळ निकाली काढू असे लेखी पत्र पाटबंधारे विभागास देण्यास भाग पाडले.

No comments