Breaking News

वडवणी रोटरी क्लबने वाहनांना लावले रेडियम


लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याचे चेअरमन धैर्यशील काका सोळंके यांच्या हस्ते उद्घाटन

 

जगदीश गोरे । वडवणी

सध्या साखर कारखाने वरील ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची रेलचेल सुरू असून अनेक वाहनांना रेडियम नसल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. अपघात होऊ नयेत म्हणून वडवणी रोटरी क्लबच्या वतीने लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखाना कार्यक्षेत्रातील शेकडो वाहनांना रेडियम लावण्याच कार्यक्रम शनिवारी घेण्यात आला. कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशीलकाका सोळंके  यांच्या हस्ते रेडियम लावण्याचे कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

रोटरी क्लब ऑफ वडवणीचे अध्यक्ष डॉक्टर विजयकुमार निपटे यांच्या पुढाकारातून लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी साखर कारखान्यावर शनिवारी वाहनांना रेडियम लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील काका सोळंके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती धारूर माजी अध्यक्ष भगवानराव शेळके बापू यांची विशेष उपस्थिती होती. रोटरी क्लबच्या वतीने वडवणी तालुक्यात दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. यावर्षी रोटरी क्लबचे अध्यक्ष डॉक्टर विजयकुमार निपटे यांच्या संकल्पनेतून लोकनेते सुंदरराव सोळंके कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ज्या वाहनांना रेडियम नाहीत त्या वाहनांना रेडियम लावण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला. रोटरी क्लबचे सर्व सदस्यांनी या कार्यक्रमासाठी पुढाकार घेतला. यावेळी रोटरी क्लबचे उपाध्यक्ष महादेव पुरी, माजी अध्यक्ष डॉक्टर दिनकर बोंगाणे, विशाल पतंगे, प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर श्रीराम लंगे, सुदाम शिंदे, सुनील कुलकर्णी, अशोक आजबे, आबासाहेब आंधळे, ज्ञानदेव आंधळे, ज्ञानेश्वर राऊत, डॉक्टर देवेंद्र थोटे, वशिष्ठ शेंडगे, संतोष गोंडे, बाळासाहेब शेळके यांची यावेळी उपस्थिती होती. वाहनांना रिफ्लेक्टर लावून अपघातापासून बचाव व्हावा हा उद्देश असल्याचे यावेळी डॉक्टर विजयकुमार निपटे यांनी सांगितले. रोटरी क्लबच्या या उपक्रमाचे कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील सोळंके यांनी तोंडभरून कौतुक केले.

सर्व वाहनांना रेडियम बंधनकारक करणार

रेडियम नसलेल्या वाहनापासून अपघात होण्याची शक्यता जास्त असते अपघात होऊ नयेत यासाठी लोकनेते सुंदरराव सोळंके सहकारी कारखान्यावर काम करणाऱ्या सर्व वाहनांना रेडियम लावणे बंधनकारक करणार असल्याच यावेळी कारखान्याचे अध्यक्ष धैर्यशील काका सोळंके यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


No comments