Breaking News

दुचाकीच्या डिग्गीतील १ लाख ७० हजार रुपयांची रक्कम चोरट्याने केली लंपास


केजच्या एसबीआय बँके समोर लावली होती दुचाकी; अज्ञात चोरट्या विरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल

गौतम बचुटे ।   केज  

येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा केज समोर उभ्या केलेल्या मोटरसायकलच्या डिग्गीतून १ लाख ७० हजार रुपये चोरी झाली आहे.

या बाबतची माहिती अशी की, सावळेश्वर (पैठण) येथील देविदास गंगाधर कदम या शिक्षकाने त्याच्या जवळील ४ लाख रुपयां पैकी २ लाख ३० हजार रुपये स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा केज मध्ये जमा करण्यासाठी गेले. त्यापैकी उर्वरित १ लाख ७० हजार रुपये त्याने मोटरसायकल क्रमांक (एम एच ४४/व्ही८०२५) ठेवून बँकेमध्ये पैसे जमा करण्यासाठी गेले असता कोणीतरी अज्ञात व्यक्तीने डिग्गीचे झाकण उघडून त्यातील १ लाख ७० हजार रुपये घेऊन पोबारा केला. या प्रकरणी अज्ञात चोरट्या विरुध्द केज पोलीस स्टेशनला गु. र. नं. ४६८/२०२० भा. दं. वि. ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल रुक्मिणी पाचपिंडे या तपास करीत आहेत.No comments