Breaking News

माणिकराव पाळवदे यांच्या निधनाने हेळंब व परिसरातील मार्गदर्शक हरवले - बबनभाऊ गित्ते

 परळी वैजनाथ : माजी उपसरपंच तथा सेवा सहकारी सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन माणिकराव जगन्नाथ पाळवदे यांच्या  निधनामुळे हेळंब व परिसरातील सामाजीक क्षेत्रात कार्य करणार्या युवा कार्यकर्त्यांचे मार्गदर्शक हरवले असल्याची प्रतिक्रिया जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा पंचायत समितीचे सभापती बबनभाऊ गित्ते यांनी व्यक्त केली.

बबनभाऊ गित्ते यांनी स्व.माणिकराव पाळवदे यांच्या कुटुंबियांची हेळंब येथील निवास्थानी आज दि.2 नोव्हेबर रोजी भेट घेवुन सांत्वन केले. यावेळी पाळवदे कुटुंबियांचे सांत्वन करताना बबनभाऊ म्हणाले की,माणिकराव पाळवदे यांच्या निधनाने तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्वपरिचित व्यक्तीमत्व होते. त्यांच्या जाण्याने ग्रामीण भागातील शेतकरी व दिनदुबळ्यांचे तारणहार व्यक्तिमत्व हरपले असून  त्यांच्या आठवणी परळीकरांच्या कायम स्मरणात राहतील. 

यावेळी  कै.माणिकराव जगन्नाथ पाळवदे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी जनक्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा पंचायत समितीचे सभापती बबनभाऊ गित्ते यांच्यासह कारभारी होळंबे ,  धनराज फड हाळमकर, दयाराम फड, पांडुरंग दहिफळे, पपन होळंबे, परमेश्वर पाळवदे, वैजनाथ आंधळे, सुंदर पाळवदे, शरद आंधळे, राहुल होळंबे, प्रल्हाद पाळवदे, समाधान आंधळे, गौतम आंधळे इतर नागरिकांनी पाळवदे  कुटुंबियांचे सांत्वन केले. यावेळी प्रा.नारायण पाळवदे, प्रा.डॉ.नागोराव पाळवदे, हेळंबचे उपसरपंच राम पाळवदे व पाळवदे परिवार उपस्थित होते.


No comments