Breaking News

दिवाळी पूर्वी ग्रामीण भागात विधुत ट्रान्सफार्म उपलब्ध करा -राजेंद्र आमटे

 


महावितरण अधीक्षक अभियंता कडे शिवसंग्रामची मागणी 

बीड :  ग्रामीण भागात अनेक गाव विधुत ट्रान्सफार्म बंद नादुरुस्त असल्या कारणाने अनेक गावं अंधारात आहेत. महावितरण ला अनेक गावातील ट्रान्सफार्म जमा केलेले असताना ट्रान्सफार्म दुरुस्ती मुळे अनेक गावं अंधारात आहेत.

ग्रामस्थाना ट्रान्सफार्म देऊन महावितरण ने ग्रामीण भागातील नागरिकांना दिवाळीच्या तोंडावर सिंगल फेज ट्रान्सफार्म देऊन अनेक गावातील अंधार दूर करावा या मागणीसाठी शिवसंग्राम विध्यार्थी आघाडीच्या वतीने महावितरण चे अधिक्षक अभियंता कोलप साहेब यांना निवेदन देण्यात आले. या वेळी ग्रामीण भागातील सिंगल फेज ट्रान्सफार्म देऊन ग्रामीण भागातील नागरिकांची  दिवाळी प्रकाशमय करावी अशी मागणी करण्यात आली. 

या वेळी आदरणीय अधीक्षक अभियाता  कोलप साहेब यांनी लवकरात लवकर ग्रामीण भागातील विधुत ट्रान्सफार्म दिवाळीच्या पूर्वी सोडवण्यात येतील असे आश्वासन कोलप साहेब यांनी दिले या वेळी शिवसंग्राम विध्यार्थी आघाडी च्या वतीने जिल्हाध्यक्ष राजेंद्र आमटे,नाळवंडी-पिंपळनेर शिवसंग्राम प्रभारी धनंजय गुंदेकार, नेकनूर  सर्कलचे जेष्ठ नेते रायचंद कापसे, चौसळा सर्कल युवा नेते रघुवीर कुरे, नानासाहेब आमटे,संतोष आमटे,काका आमटे,दीपक आमटे ,आदींच्या वतीने मागणी करण्यात आली 

     

No comments