Breaking News

सय्यद इलयास यांचा सत्कार


 

बीड :   गेल्या सहा वर्षांपासून विद्युत महावितरण कंपनी आणि नगरपरिषद कडे निवेदनांच्या माध्यमातून शहरातील मुहम्मदिया कॉलनी या प्रभाग क्रमांक 19, 20 आणि 21 मध्ये आवश्यक संख्येत विद्युत डीपी आणि 125 इलेक्ट्रिकल पोल लावण्यात यावे. अशी मागणी करणारे ए.आय.एम.आय.एम.चे युवा नेते सय्यद इलयास यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले असून महावितरण कंपनीने या प्रभागात दोन नवीन डीपी बसविल्या आहेत तसेच 25 पोल ही ही रोवले आहेत.

 यामुळे पक्षाचे बीड जिल्हाध्यक्ष ॲड. शेख शफीक भाऊ, सचिव पठाण अय्युब खान, माजी पक्ष प्रवक्ते तथा ज्येष्ठ नेते हॅरिसन फ्रान्सिस रेड्डी आणि उर्फ लालू भैय्या यांनी त्यांचा पुष्पहार घालून हृदयी सत्कार केला. याप्रसंगी बोलताना सय्यद इलयास यांनी म्हटले की, हे यश फार मोठ्या संघर्षानंतर मिळाले असून तेही मागणीप्रमाणे पूर्णत्वास आलेले नाही. या तिन्ही प्रभागांमध्ये अजूनही पाच डीपी आणि शंभर विद्युत खांबाची अत्यंत आवश्यकता आहे व ही मागणी पूर्ण होईपर्यंत मी किंवा माझा पक्ष स्वस्थ बसणार नाही. चांगल्या विद्युत सेवेसाठी माझा लढा यापुढेही चालूच ठेवणार आहे. त्यांच्या या मनोगताचे जिल्हाध्यक्षांसह सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.


No comments