Breaking News

शिरूर नगर पंचायतीची आरक्षण सोडत जाहीर!


आठ जागा राखीव तर नऊ जागा सर्वसाधरण

शिरूर कासार : येथील नगर पंचायतीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राखीव व सर्वसाधारण जागेवर चर्चा केल्या जात होत्या.  आज तहसिल कार्यालयाच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी टिळेकर यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत जाहीर करण्यात आली असून एकूण १७ वार्ड असलेल्या शिरुर नगर पंचायतीच्या निवडणुकीसाठी आठ जागा राखीव उमेदवारांना तर उर्वरीत नऊ जागा सर्वसाधरण उमेदवारांसाठी सोडण्यात आल्या आहेत. 

गत पाच वर्षांपूर्वी शिरुर कासार नगर पंचायत म्हणून उदयास आली. त्यानंतर ही दुसऱ्यांदा नगर पंचायतीसाठी निवडणूक होत आहे. पहिल्या निवडणुकीत संधी हुकल्या नंतर दुसऱ्या पंचवार्षिक निवडणुक लढविण्यास अनेकांनी वार्डात तयारी करण्यास सुरवात केली होती. नगर पंचायतीच्या निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर कोणता वार्ड राखीव व सर्वसाधारण उमेदवारांसाठी सुटतो. याकडे सर्वांच्या नजरा होत्या.

 अखेर मंगळवारी वार्ड निहाय आरक्षण सोडतीची प्रकिया पार पडली.   येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात उप विभागीय अधिकारी टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी तहसीलदार श्रीराम बेंडे, नायब तहसीलदार किशोर सानप, नायब तहसीलदार अंजली गायकवाड यांची उपस्थिती होती.  यावेळी एका लहान मुलीच्या हाताने चिठ्ठ्या काढून प्रभाग निहाय आरक्षण काढण्यात आले. एकूण १७ वार्ड असलेल्या नगर पंचायतीच्या आठ जागा राखीव उमेदवारांसाठी तर नऊ जागा सर्वसाधारण उमेदवारांना निवडणूक लढविता येणार आहे. यामुळं ज्यांनी यापूर्वीचं वार्डात तयारी केली होती. आशा पुढाऱ्यांचा मात्र हिरमोड झाला आहे. 


ही आहेत राखीव व सर्वसाधारण वार्ड


वार्ड ०१ सर्वसाधारण महिला

वार्ड ०२  सर्वसाधारण पुरुष 

वार्ड ०३ सर्वसाधारण पुरुष

वार्ड ०४  ओबीसी महिला

वार्ड ०५ सर्वसाधारण महिला

वार्ड ०६ सर्व साधारण पुरुष

वार्ड ०७ सर्व साधारण महिला

वार्ड ०८ सर्व साधारण महिला

वार्ड ०९  महिला ओबीसी

वार्ड १० अनुसूचितजाती जमाती महिला

वार्ड ११ ओबीसी महिला

वार्ड १२ सर्वसाधारण महिला

वार्ड १३ ओबीसी पुरुष

वार्ड १४ अनुसुचितजाती जमाती पुरुष

वार्ड १५ ओबीसी पुरुष

वार्ड १६ सर्वसाधारण पुरुष

वार्ड १७ सर्वसाधारण पुरुष


No comments