Breaking News

दीपावली सणाची बाजारात खरेदी करताना खबरदारी घ्यावी- सपोनि नितिन मिरकर यांचे आवाहन

 


जगदीश गोरे । वडवणी


सध्या दीपावलीचा सण सुरू होत आहे त्यानिमित्ताने बाजारात खरेदीसाठी किंवा बाहेरगावी जाताना घरात पैसे, दागिने ठेऊन जाऊ नये तसेच दिपावळी किंवा लग्न समारंभ करिता बाहेरगावी जातांना मौल्यवान वस्तु, पैसे बँकेत किंवा सोबत घेऊन जावे. व आपण बाहेरगावी जाणार असल्यास  आपल्या शेजाऱ्यांना तसेच पोलीसांना आपण बाहेरगावी जात असल्याची माहिती द्यावी तसेच बाहेरगावी जातांना महिलांनी प्रवासात दागिने घालून जावू नये व गर्दीच्या ठिकाणी व बसमध्ये चढताना, उतरताना आपले पॉकेट, पर्स, बॅगकडे लक्ष ठेवुन आपली खबरदारी घ्यावी असे आवाहन वडवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांनी केले आहे.

  

दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारात गर्दी होणार असून त्यामुळे नागरिकांनी सावधानतेने खरेदी करावी व्यापारी, दुकानदार, सराफा यांनीही याकाळात मोठया प्रमाणात माल खरेदी केलेला असतो त्यामुळे रात्रीचे वेळी सुरक्षा ठेवावी, CCTV कॅमेरे लावावेत व बाजारामध्ये खरेदी करताना मोबाईल किंवा पैसे वरच्या खिशात ठेऊ नये तसेच आपली गाडी व्यवस्थीत ठिकाणी पार्क करून हँडल लॉक करून ठेवावी तसेच परिसरामध्ये किंवा आपल्या कॉलनी मध्ये काही संशयीत हालचाली, संशयीत इसम किंवा काही अनुचित प्रकार आढळल्यास किंवा दिसल्यास पोलीस स्टेशन वडवणी 02443257533 या क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा असे आवाहन वडवणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन मिरकर यांनी केले आहे.




No comments