Breaking News

नागरिकांनी एकजुटीने बिबट्यापासून सावधानता बाळगा-संतोष थोरात


आष्टी: ज्या वाघाला पाहण्यासाठी  सर्कस किंवा प्राणी संग्रहालयात जावं लागायचं,तोच बिबट आता गावात , वस्तीत दिसू लागला,लोकांवर हल्ले करू लागला आहे.

यासाठी निर्भीड पत्रकार संघ, महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना, ऑल इंडिया पँथर संघटना, व ज्योत फाउंडेशन च्या वतीने आपणास जाहीर आवाहन करण्यात येते की, आष्टी तालुक्यातील सर्व ग्रामीण व शहरी भागातील नागरिक, लहान मुले, वृद्ध , महिला यांनी एकजुटीने बिबट पासून सावधानता बाळगावी, रात्री अपरात्री, शेतात जाऊ नका, शेतात एकटे झोपायला जाऊ नका, पिकांना पाणी देण्यापूर्वी ,पिकात काही लपलेलं आहे का याची खात्री करा, शेतात एकट्या मुलांना ठेऊ नका, तसेच गटाने शेतात काळजी घेणे, गरजेचे आहे, वस्तीवर राहणाऱ्या कुटुंबानी विशेष काळजी बाळगणे गरजेचे आहे, वन विभागाने तात्काळ पिंजऱ्यांची व्यवस्थेत वाढ करणे गरजेचे आहे, सर्वांनी काळजी घ्या , नरभक्षक बिबट्यापासून सावधानता बाळगा, असे आवाहन निर्भीड पत्रकार संघाचे जिल्हा सचिव संतोष थोरात यांनीं केले आहे.


No comments