Breaking News

रस्त्याचे काम तात्काळ सुरू करा,अन्यथा तीव्र आंदोलन करू - राजेंद्र आमटे,राहुल टेकाळे


पिंपळनेर रोड वर तेलगाव नाका ते नागापूर फाटा रास्तासाठी स्वाक्षरी मोहीमस सुरवात 

बीड :  अनेक वर्षांपासून मृत्यूचा सापळा म्हणून गणला जाणारा बीड -पिंपळनेर रस्त्याच्या दुरवस्था मुळे अनेक नागरिकाना आपले प्राण गमवावे लागले आहेत. कोणाचा मुलगा ?,कोणाचे वडील? कोणाचा भाऊ?असे एक नव्हे अनेकांनी आपल्या परिवारातील नातेवाईक या रस्त्याच्या खराबी मुळे गतप्राण झाले   नागरिकांनी वारंवार पाठपुरावा करून या रस्त्याची मंजुरी करून घेतली मंजुरी होऊन एक ते दीड वर्ष होऊन घेले तरी गुत्तेदार काम सुरू करत नाही काम सुरू केल्याचा दिखावा करत थातूर- मातूर  काम करून बिल रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

      

तात्काळ बीड -पिंपळनेर रस्त्यावरील "तेलगाव नाका ते नागपूर फाटा "रस्त्याचे रखडलेले काम  तात्काळ व दर्जेदार काम सुरू करण्यात यावे. हे काम गुत्तेदार पोसण्यासाठी नव्हे तर  नागरिकांच्या हितासाठी दर्जेदार करण्यात यावे या मागणीसाठी बीड -पिंपळनेर रस्त्यारील उमरी फाटा येथे राजेंद्र आमटे व राहुल टेकाळे यांच्या वतीने रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्यात यावे या मागणीसाठी निवेदन ही दिले होते परंतु प्रशासनाने कोणत्याही दखल न घेता   झोपेचं सोंग करणाऱ्या प्रशासनाच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात अली  तात्काळ रस्त्याचे काम सुरू करण्यात आले नाही तर खांडे पारगाव, नागपूर, उमरी, उमरद, म्हाळस जवळा, पिंपळगाव, बऱ्हाणपूर, मासापूर, अंथरुवन प्रिंपी, ईट, गगनाथवाडी, पिंपळनेर, बाबुळवाडी,  बेलवाडी, नाथपुर, रामगाव, लोणी, शहजानपूर, साडरवन, लिबरुई, पिंपळादेवी, रंजेगाव, मूगगाव, पाटेगाव, सुरडी, नवापूर, बोरदेवी, केसापुरी परभणी, ताडसोन्हा, बेलवाडी, बाबूलवाडी, बेडुकवाडी, गुंदा, गुडवाडी, आडगाव, वडगाव, खुद्रास, गुंजाळा येथील ग्रामस्थ समवेत तीव्र स्वरूपाचे उग्र आंदोलन करण्यात येईल असे राजेंद्र आमटे,राहुल टेकाळे यांच्या वतीने इशारा देण्यात येत आहे

    


No comments