Breaking News

उमेदला नाउमेद करणाऱ्या शासना विरुद्ध कर्मचाऱ्यांचे बेमुदत काम बंद आंदोलन


महिला सबलीकरणचा उद्देशच खासगीकरनामुळे बारगळणार?

शिरुर कासार :  " उमेद " कर्मचाऱ्याच्या पुनर्नियुक्ती विरोधात काढलेले अन्यायकारक परिपत्रक तात्काळ रद्द न केल्यास उमेद अभियान मार्फत असहकार आंदोलन केले होते ते आंदोलन दिनांक 30/ 09/2020 ते 21/102020  पर्यत करत असताना ते कोणती ही अट न घालता माघे घेण्यात आले सदर आंदोलनाचा शासन स्तरावर कोणताही निर्णय न घेतल्या मुळे राज्य सरकारच्या विरोधात पूर्ण राज्य मध्ये गाव  तालुका , जिल्हा, स्तरावर उमेद कर्मचारी कल्याणकरी मंडळ  तर्फे पाच नोव्हेंबर या तारखे पासून  काम  बंद आंदोलन  करण्यात येणार आहे.

उमेद- MSRLM अंतर्गत ग्रामिण भागातील गरीब कुटूंबांना स्वयंसहायत्ता समुहाच्या माध्यमातूम संघटित करण्याचे काम सुरू असून स्वंयसहायता समुह, ग्राम संघ व प्रभाग संघ अशी त्रिस्तरी संस्थीय बांधणी करुन या संस्थेच्या माध्यमातून लक्ष घटकांना, कुटूंबांना सामाजिक - आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देण्याचे काम अविरतपणे सन २०११ पासून सुरु आहे. उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामिण जिवनोन्नती अभियानांतर्गत कंत्राटी स्वरूपात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अचानक १०/९/२०२० च्या पत्रान्वये पुनर्नियुक्ती थांबवणेचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच २६ ऑगस्ट २०२० चे परिपत्रक काढून राज्यभरातील कर्मचाऱ्यांची फेरनियुक्ती ही CSC - E Governance या खाजगी कंपनीच्या माध्यमातून करण्याचे आदेश देण्यात आल्याने ऐन उमेदीच्या दिवसात अभियानाच्या वाढीसाठी, महिलांच्या उद्धारासाठी स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून अभियानात रुजू झालेल्या सगळ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. 

७० टक्के कर्मचारी हे चाळीशीपार झालेले असल्याने त्यांचे भवितव्य अंध:कारमय होणार असून त्यांचे वर अवलंबून असणाऱ्या ग्रामस्तरावरील हजारो महिला समुपदेशकांवरही उपासमारीची वेळ आली आहे.   खाजगीकरणाचा पुरस्कार करणाऱ्या केंद्र सरकारच्या पावलावर पाऊल ठेऊन राज्य सरकार जर भांडवलदारांचे, ठेकेदारांचे हित जोपासण्यात धन्यता मानत असेल तर  ८ ते १० वर्षापासून महिला सबलीकरण आणि सक्षमीकरणासाठी अखंड सेवा देणाऱ्या कर्मचारी याना सरकारने खाजगी कंपनीचे हित जोपासणेसाठी हजारो कर्मचाऱ्यांना दारिद्रयाच्या खाईत लोटण्याच्या सुलतानी परिपत्रकाविरुद्ध   आज दिनांक 05/ 10/2020 पासून काम बंद आंदोलन हे पूर्ण  महाराष्ट्तील सर्व  गावातील 4 लाख 81 हजार महिला बचत गट, ग्रामसंघ, प्रभाग संघ , केडर, तालुका स्तरीय कर्मचारी जिल्हा स्तरीय कर्माची व राज्य स्तरीय कर्मचारी या काम बंद आंदोलन मध्ये सहभाग घेणार आहेत त्या मध्ये सहभागी म्हणून बीड जिल्ह्यातील 11 तालुक्याने काम बंद आंदोलन मध्ये भाग घेतला आहे यामुळे कर्मचारी व महिला सबलीकरणच गोठवण्याच्या डाव असल्याचे बोलले जात आहे.

यावेळी विठ्ठल ढाकणे तालुका अभियान व्यवस्थापक , अब्दुल सय्यद , रमेश धोत्रे , गोविंद इंदूरे, अनिल पवार, कुंदन मोरे, अमोल गलांडे,  अमोल गर्जे , पुष्पा नागरगोजे, विजया दिवटे सर्व कर्मचारी सहभागी आहेत.No comments