Breaking News

कार - कंटेनरचा भीषण अपघात पाच जण ठार गेवराईच्या बायपासवरील घटना

अविनाश इंगावले । गेवराई   

कारचालकाचा ताबा सुटल्याने समोरून येणाऱ्या कंटेनरला जोराची धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात कार मधील पाच जण ठार झाल्याची दुर्देवी घटना गेवराईच्या बायपास रोडवर गुरुवारी (दि.२६) सकाळी घडली. मृतात वंचीत बहुजन आघाडीच्या एका पदाधिकाऱ्याचा समावेश असल्याची माहिती मिळते. 

मिळालेल्या माहिती नुसार लातूरचे वंचित बहुजन आघाडीचे एक पदाधिकारी  आपल्या सहकार्यासह औरंगाबादला कामानिमित्त गुरुवारी कार मधून जात होते. दरम्यान गेवराई शहरातील झमझम पेट्रोल पंपाच्या पाठिमागे असलेल्या बायपास रोडवर कार येताच कारचालकाचा ताबा सुटल्याने समोरून येत असलेल्या  इंडीयन ऑईलच्या कंन्टेनरला जोराची धडक बसली. हा अपघात एवढा भीषण होता की, कार मधील तिघांचा जाग्यावरच मृत्यू झाला तर अन्य दोघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे समजते. मृतांमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकऱ्याचा समावेश असल्याची माहिती मिळते. 


No comments