Breaking News

वडवणी नगरपंचायतच्या सफाई कामगार महिलांना शिवसेनेच्यावतीने साड्यांचे वाटप


जगदीश गोरे ।  वडवणी

दिपावली व भाऊबीजीचे औचित्य साधून वडवणी नगरपंचायतीच्या सफाई कामगार महिलांना शिवसेनेच्या वतीने साडी चोळीचे वाटप करून दिवाळी गोड करण्यात आली. 

वडवणी तालुका शिवसेनेच्या वतीने शिवसेना मा. तालुका प्रमुख विनायक (बप्पा) मुळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमास शिवसेना शहरप्रमुख नागेश डिगे, महिला आघाडीच्या उपजिल्हासंघटक प्रमीलाताई माळी, युवराज शिंदे, युवा नेते वचिष्ट शेंडगे,उध्दव काकडे,अशोक गोंडे, नरेंद्र राठोड, महिला आघाडीच्या आवचर, उपशहर प्रमुख अशोक बापु चाटे,मुन्ना पवार, शिवसेनेचे युवा नेतेसंजय धपाटे, गणेश म्हेत्रे, सचिन भैरट, मधुकर ठोसर, दत्ता वाघमारे, शहाजी लोकरे, प्रकाश‌ वजीर, सचिन दिवटे, बाळासाहेब मस्के यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


No comments