Breaking News

रस्तादुरुस्तीसाठी माजलगावात लोकतांत्रिक जनता दलाचे रास्तारोको आंदोलनबाळासाहेब आडागळे । माजलगाव

शहरातून जाणाऱ्या मंजरथ  रोड ची अवस्था अतिशय दैनिय झाली असून रस्त्यावर खड्डे ,व सांड पाण्यामुळे या रस्त्या वरुन जाणाऱ्या परिसरातील खेड्यामधील लोकांची मोठ्या प्रमाणात होणारी पिळवणुक थांबवून हा रस्ता त्वरीत तयार करा या मागणी साठी आज लोकतांत्रिक जणता दलाच्या वतीने साठे चौक डी पी जवळ भव्य रस्ता रोको व निदर्शने आंदोलन करण्यात आले. 

 

मंजरथ, देपेगाव, लुखेगाव, चिंचोली, गोविंदपूर, मनूर आदी  खेड्यांचा संपर्क या रस्त्या मुळे होत असुन हा रस्ता २४ तास वाहतुक असणारा आहे. परंतु या रस्त्याची फार दैनिय दुरावस्था झालेली असून रस्त्यावर नाल्याच्या पाण्यामुळे मोठमोठे खड़े पडलेले आहेत. मोठे वाहन तर सोडाच या ठिकाणी दुचाकीपण चालवणे मुश्कील आहे. अनेक वेळा अपघात झाले आहेत. मतदानापुर्वी आमदार प्रकाश  सोळंके यांनी या रोडवरून एसटी मधुन प्रवास करुन जनतेला दिखावा केला होता. 

परंतु ते आता सत्तेवर असतानाही अजूनही रस्त्याची साधी डागडुजी केलेली नाही. पंकजाताई मुंडे,  प्रितमताई मुंडे व आमदार आर. टी. देशमुख यांनी देखील हा रस्ता करु म्हणुन आश्वासन दिले होते. या रस्त्यावरुन गंगेकडे जाताना अनेक मयत लोकांचे अस्थी कलश घेवून जावा लागते. परंतु या रस्त्यावरुन वाहतुक झाल्याने अनेक लोकांना मोठ्या प्रमाणपत त्रास सहन करावा लागतो. तरी मंजरथ रोड वरील दुरावस्थेमुळे नागरीक व त्या रोड वरुन जाणाऱ्या परिसरातील खेड्यामधील लोकांची मोठ्या प्रमाणात होणारी पिळवणुक थांबवून हा रस्ता त्वरीत रहदारी लायक तयार करा या मागणी साठी  संभाजी चौकापासून जाणाऱ्या मंजरथ रोडवर साठे चौक डिपी जवळ आज दि  ०२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वा  लोकतांत्रिक जनता दलाचे बीड जिल्हाध्यक्ष सय्यद सलीम बापू  यांच्या वतीने तिव्र रास्ता रोको व निदर्शने आंदोलन करण्यात आले. या वेळी आपल्या मागण्याचे निवेदन इंगळे मंडळ अधिकारी पी. आय. राठोड व इंजिनिअर सुरवसे यांना देण्यात आले.


No comments