Breaking News

आ. सतीश चव्हाणांच्या हॅट्रिकला परळी मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा निर्धारपरळी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पदवीधर निवडणूक जिंकून आ. सतीश चव्हाण यांना हॅट्रिक मिळवून देण्यासाठी परळी मतदारसंघातून सर्वाधिक मताधिक्य देण्याचा निर्धार परळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी - कार्यकर्त्यांनी केला आहे. 

निवडणूक प्रक्रियेत जबाबदाऱ्या निश्चित करणे तसेच मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने परळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक परळी येथील ना. मुंडेंच्या जगमित्र या संपर्क कार्यालयात पार पडली. 

यावेळी आपल्या अध्यक्षीय समारोपात रा.कॉ. चे तालुकाध्यक्ष लक्ष्मण पौळ यांनी आ.सतीष चव्हाण यांना निवडून आणून ना.मुंडे साहेबांचा लौकिक राज्यात वृद्धिंगत कराव असे आवाहन केले.

रा.कॉ.चे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी आ. सतीश चव्हाण यांचे परळीशी आणि ना.धनजय मुंडे यांच्याशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध यावर भाष्य करीत परळी दुष्काळग्रस्त असताना आ.सतिष चव्हाण यांनी 40 विंधन विहिरी त्यांच्या नगराध्यक्षीय कार्यकाळत दिल्याचे सांगितले. प्रा.डॉ.सुनील चव्हाण यांनी मतदान करण्याची पद्धत याविषयी मार्गदर्शन केले. डी. जी. शिंदे यांनी एकूण मतदान आणि बुथरचना व प्रभागनिहाय मतदान याची माहिती सांगितली. प्रा.डॉ. विनोद जगतकर यांनी पुरोगामीत्व जपणाऱ्या आ.चव्हाण यांची हैट्रिक साधा म्हणून आवाहन केले

प्रा.डॉ.धोंडगे यांनी आ.चव्हाण यांनी विधिमंडळात केलेल्या कामाचा कार्यवृत्तान्त सादर करीत कार्यकर्त्यांनी तळमळीने निवडणूक आपल्या हातात घ्यावी हे सांगितले. ज्येष्ठ नेते वैजनाथ सोळंके व सुरेश टाक यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवून कोरोनाच्या प्रादुर्भावात होणारी ही निवडणुक सर्व नियमानुसार व्हावी ही अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी बाळासाहेब देशमुख, प्रा.डॉ.धोंडगे, प्रा.डॉ. मधुकर आघाव, लक्ष्मण पौळ, बाजीराव धर्माधिकारी,सुरेश टाक,वैजनाथ सोलंके, प्रा.डॉ. विनोद जगतकर, चेतन सौंदळे आदींनी मनोगत व्यक्त केले तर या बैठकीचे संचलन प्रा. शंकर कापसे यांनी केले.

या बैठकीस बाळासाहेब देशमुख, लक्ष्मण पौळ, बाजीराव धर्माधिकारी, सुरेश टाक, प्रा.डॉ.धोंडगे सर, प्रा.डॉ. विनोद जगतकर, प्रा.डॉ. मधुकर आघाव, वैजनाथ सोळंके, प्रा.डॉ.पी.एल. कराड, जाबेर खान पठाण, जयपाल लाहोटी, बाशीत भाई, गोपाळ आंधळे, अनवर मिस्कीन, माधवराव ताटे, चेतन सौंदळे, ऍड. मनजीत सुगरे, जयराज देशमुख, रमेश भोयटे, किशोर पारधे, महादेव रोडे, नितिन रोडे, संतोष शिंदे, अनिल आष्टेकर, विजय भोयटे, सय्यद सिराज, शंकर कापसे, केशव गायकवाड, रामेश्वर महाराज कोकाटे, राधाकृष्ण साबळे, प्रा.शाम दासूद, प्रा.डॉ. सुनिल चव्हाण, डी.जी.शिंदे, जमील अध्यक्ष, शरद सोळंके, श्रीनिवास देशमुख, अजय जोशी, बळीराम नागरगोजे, अमर टाकळकर, पवन फूटके, रवि मुळे, दिनेश गजमल, लक्ष्मण वाकड़े, राहुल ताटे, के.डी. उपाडे, रमेश मस्के, अमोल कानडे, दत्ताभाऊ सावंत, सुरेश गित्ते, धम्मा अवचारे, संजय देवकर, अल्ताफ पठाण, महेंद्र रोडे, लाला खान पठाण, सुरेश नानावटे, बाबूशा कदम, मुख्तार शेख, सचिन जोशी, शरद कावरे, अमर रोडे, अभिजित तांदळे, राजकुमार डाके, नाझेर हुसैन, गणेश सुरवसे, सतीश गंजेवार, रवि आघाव,संकेत दहिवडे, आकाश डोंगरे, श्रीपाद चौधरी, वैजनाथ जोशी, कृष्णा डूबे, प्रशांत देशमुख, एस.के.गीत्ते, श्रीहरि कवडेकर, एस.के.शेप, एस.व्ही.माने, अमझद खान, साझीद कॉन्ट्रेक्टर, शेख सिराज, लक्ष्मण देवकर, निलेश वाघमारे यांसह आदी उपस्थित होते.
No comments