Breaking News

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विश्वासावर जनतेची पुन्हा एकदा मोहोरबिहारसह पोटनिवडणुकीतील  विजयावर पंकजाताई मुंडे  यांनी ट्विट करून केले अभिनंदन

मुंबई :  बिहार विधानसभा निवडणुकीसह  विविध राज्यातील पोटनिवडणूकीत भाजपला मिळालेले घवघवीत यश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर जनतेने पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला असल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी प्रतिक्रिया भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासह विजयासाठी मेहनत घेणा-या कार्यकर्त्यांचे त्यांनी अभिनंदन केले आहे. 

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीए ला बिहारमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले आहे, याचा मला मनापासून आनंद झाला आहे.  अपेक्षित विजयाची परंपरा भाजपच्या कार्यकर्त्यांनी कायम ठेवली आहे. 

मोदीजींच्या सभांना मिळालेला प्रचंड प्रतिसाद, त्यांच्या 'सबका साथ,सबका विकास आणि सबका विश्वास', हया धोरणाचे आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या अपार मेहनतीचे हे फळ आहे अशा शब्दांत पंकजाताई मुंडे यांनी या निकालावर ट्विट करून प्रतिक्रिया दिली. बिहार सोबतच गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश याठिकाणच्या पोटनिवडणूकीत भाजपाने घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. या संपूर्ण विजयाबद्दल     त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, चारही राज्यांचे मुख्यमंत्री तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे. No comments