Breaking News

नरभक्षक बिबट्याचा वृद्ध महिलेवर हल्ला


जखमी महिलेला नगरच्या रुग्णालयात केलं दाखल


पुतण्याच्या प्रसंगावधानतेमुळे महिलेची झाली सुटका

एकाच मार्गावरील  सुरडी- किन्ही- मंगरूळ तर आज पारगाव जोगेश्वरी गाव बिबट्याचा हल्ला

वन विभाग बिबट्याच्या मागावर तर बिबट्या करतोय नागरिकांना लक्ष

के. के. निकाळजे । आष्टी 

लागोपाठ दबा धरून बसलेला नरभक्षक बिबट्या लागोपाठ नागरिकांना लक्ष करून हल्ला करत आहेत. आष्टी तालुक्यातील एकाच मार्गावरील  सुरडी- किन्ही- मंगरूळ तर आज पारगाव जोगेश्वरी गावात बिबट्याने शिरकाव केला असून शेतातून गवत घेऊन निघालेल्या वृद्ध महिलेवर त्याने हल्ला केल्याची घटना घडली. मात्र त्याठिकाणी पुतण्याच्या प्रसंगावधानतेमुळे वृद्ध महिलेची झाली सुटका झाली. या हल्ल्यात जखमी झालेल्या महिलेला उपचारासाठी  रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील पारगाव जोगेश्वरी येथील शालन शहाजी भोसले ही वृद्ध महिला रविवारी (दि.२९) सकाळी आपल्या पशुधनासाठी शेतातून गवत घेऊन परतत असताना दबा धरून बसलेल्या नरभक्षक बिबट्याने त्या वृद्धेवर झडप घातली. परंतु जवळच असलेल्या त्यांच्या पुतण्याने प्रसंगावधानता बाळगून बिबट्याच्या तावडीतून शालन भोसले यांची सुटका केली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. मात्र या हल्ल्यात शालन भोसले ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या गळ्यावर इजा झाली आहे. आष्टीच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी शालन भोसले यांना अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. 

..आतापर्यंत दोघांचा बळी तर दोघी जखमी


गेल्या काही महिन्याभरापासून बिबट्या आष्टी, शिरुरसह गेवराई तालुक्यात दिसला अशी चर्चा होत असताना आष्टी तालुक्यात दबा धरून बसलेला नरभक्षक बिबट्या नागरिकांना लक्ष करून हल्ला करत आहे. आतापर्यंत नरभक्षक बिबट्याने दोघांचा बळी घेतला असून दोघींवर हल्ला केला आहे. तालुक्यातील एकाच मार्गावर  काही अंतरावर असलेल्या  सुरडी- किन्ही- मंगरूळ तर आज पारगाव जोगेश्वरी गाव बिबट्याने झडप घातली आहे. बिबट्या एकाच दिशेने पुढे जात असून बिबट्या पकडला जात नाही, तोपर्यंत नागरिकांनी सावधानता बाळगणं गरजेचं आहे. No comments