Breaking News

सासऱ्यानेचं केला सुनेचा विनयभंग


गौतम बचुटे । केज  

तालुक्यात सासऱ्यानेच आपल्या सुनेचा विनयभंग  केल्याची घटना घडली असून केज पोलीस ठाण्यात सुनेच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बाबतची माहिती अशी की, दि. ११ऑक्टोबर रोजी नाव्होली येथे सकाळी ११:०० वा. राहात्या घरी सासऱ्याने त्याच्या सुनेची वाईट हेतूने साडी ओढली व हाताला धरून विनयभंग केला. या बाबत तिने जाब विचारला असता सासरा, सासू, दीर व नणंद यांनी तिला मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली. पीडित महिलेने दि.१६ ऑक्टोबर रोजी पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज दिला होता. त्याची चौकशी करून दि. ६ नोव्हेंबर रोजी केज पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादी नुसार गु. र. नं. ४७३/२०२० भा. दं. वि. ३५४, ३५४ (अ), ३२३, ५०४, ५०६, व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल मुकुंद ढाकणे हे करीत आहेत.


No comments