Breaking News

मागासवर्गीय, अदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत बस पासेससह सायकल पुरवठा कराकृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई मस्के यांची समाजकल्याण सभापतींसह उपआयुक्तांकडे मागणी

गेवराई : समाजकल्याण विभागाकडून अपंग विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप करण्यात येते, त्याच धर्तीवर भटके विमुक्त जाती जमाती, अदिवासी, मागासवर्गीय तसेच इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या दृष्टीने मोफत सायकल पुरवठा करण्यात यावा, तसेच ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याच्या दृष्टीने शहरात जाण्या-येण्यासाठी मोफत एस.टी.बसचे पास उपलब्ध करून देण्यासाठी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांनी समाजकल्याण सभापतीसह समाजकल्याण उपआयुक्त यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

        

भटके विमुक्त जाती-जमाती, अदिवासी, मागासवर्गीय तसेच इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या पालकांना त्यांच्या शिक्षणासाठी सायकल घेणे, तसेच महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात जाण्या-येण्याचा खर्च करणे शक्य होत नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना शिक्षणात अडथळे निर्माण होत आहेत. यामुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून दुरावत जातात. त्यामुळे समाजकल्याण विभागाकडून ज्याप्रमाणे अपंग विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत सायकल पुरवठा करण्यात येतो, तशाचप्रकारे भटके विमुक्त जाती जमाती, अदिवासी, मागासवर्गीय तसेच इतर मागासवर्गीय समाजातील विद्यार्थ्यांना देखील सायकल पुरवठा करण्यात यावा, तसेच ग्रामीण भागातील या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्याच्या दृष्टीने शहरात जाण्या-येण्यासाठी मोफत एस.टी.बसचे पास उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने योजना राबविण्याची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांनी सोमवार दि.23 रोजी समाजकल्याण सभापती कल्याण आबुज तसेच समाजकल्याण विभागाचे उपआयुक्त मडावी यांची भेट घेऊन केली. यावेळी समाजकल्याण सभापती कल्याण आबुज यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत यासंदर्भात विशेष तरतूद करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले. तर उपआयुक्त मडावी यांनी यासंदर्भात विशेष लक्ष घालून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु असे आश्वासन कृषी ल पशुसंवर्धन सभापती सविताताई बाळासाहेब मस्के यांना दिले.


No comments