Breaking News

आष्टी येथील डी.फार्मसी कॉलेजचा शंभर टक्के निकालआष्टी :  येथील आनंद चारिटेबल संस्था संचलित आष्टी येथील कॉलेज ऑफ फार्मसीचा महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांनी नुकताच द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर केला आहे या ही वर्षी निकालाची परंपरा कायम राखत कॉलेज चा शंभर टक्के निकाल लागला आहे.

 

द्वितीय वर्षातील विद्यार्थी   संकेत लक्ष्मण कोल्हे ९७.६० टक्के गुण मिळवून सर्वप्रथम क्रमांक मिळवला.कु.उषा भीमराव केंगार ९४. ७० टक्के (सर्वद्वितीय), मोहोळकर ऋषिकेश अर्जुन मोहोळकर ९४.२० टक्के (तृतीय ) क्रमांक मिळवला आहे. ९० टक्के पेक्षा जास्त पुढे गुण घेऊन यश संपादन करणारे कु.अनुराधा काकासाहेब पोकळे ९४ टक्के ,कृष्णा अर्जुन मोहोळकर ९३.८० टक्के,कु. धनश्री सोपान धोंडे ९३.७० टक्के , गोसावी निलेश बलगिर गोसावी  ९३.५० टक्के ,गौरी गजानन शिंदे ९३.४० टक्के ,कु.अश्विनी परसराम आहेरकर ९२.६० टक्के , राजवर्धन धुलीनाथ देवकाते ९१.४० टक्के , कु. अर्शिया रिजवान सय्यद ९०.१० टक्के  या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या कॉलेजचा निकाला विषयी सांगताना प्राचार्य सुनील कोल्हे म्हणाले की, कॉलेजमध्ये सुसज्ज प्रयोगशाळा, ग्रंथालय, संगणक कक्ष, नियमित होणारे लेक्चर प्रॅक्टिकल्स शिक्षकांचे सर्व विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन आणि २५ मार्चपासून ते ३० सप्टेंबरपर्यंत कोराना महामारीच्या  काळातसुद्धा कॉलेजच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा, मोबाईल, यूट्यूब चॕनल अशा माध्यमांचा वापर करून लेक्चर घेतले.

 क्लास टेस्ट,बोर्डाच्या धर्तीवर सराव परीक्षा असे वेगवेगळे उपक्रम ऑनलाइन पद्धतीने राबवले व सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोचवले.त्यामुळे हे यश मिळू शकले.शंभर टक्के निकाल लागला आहे.या कॉलेजची स्थापना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव धोंडे यांनी २००६ साली केली.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना व्यवसायिक उच्च शिक्षण मिळावे,त्यांना उच्च शिक्षणासाठी बाहेर जावे लागत होते पालकांची व विद्यार्थ्यांची हेळसांड होत होती म्हणून आष्टी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी फार्मसी या व्यावसायिक कोर्सची सुरुवात केली. चौदा वर्षात ८०० विद्यार्थी या कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन आज आरोग्य क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत.या फार्मसी क्षेत्रांमध्ये अजुन एक भर म्हणजे २०१६ साली आष्टी या ठिकाणी बी.फार्मसी कॉलेजचीसुद्धा स्थापना केली.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भीमराव धोंडे, संचालक अजय धोंडे, प्रशासकीय अधिकारी डॉ. डी. बी. राऊत, प्रा. शिवदास विधाते, दत्तात्रय गिलचे, माऊली बोडखे, संजय शेंडे, पर्यवेक्षक शिवाजी वनवे यांनी उत्तीर्ण विद्यार्थी ,प्राचार्य सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.


No comments