Breaking News

आमदार धस पुन्हा चर्चेत : आपल्या मुलाला आखाड्यात कुस्तीच्या डावात करतायत तरबेज

सोशल मीडियावरील व्हायरलं व्हिडीओची मतदारसंघात एकच चर्चा 


के. के. निकाळजे । आष्टी  

आ.सुरेश धस जितके ते राजकारणात आक्रमक म्हणून ओळखले जातात तितकेच ते सामान्य जिवनातही नेहमीच आपल्या अनोख्या शैलीने चर्चेत राहिलेले व्यक्तीमत्व आहे.

अस्सल ग्रामीण जीवनाचा प्रवास करत आलेल्या आ.धस यांनी आपल्या आवडी निवडी माञ रांगड्या पद्धतीनेच आजपर्यंत जगासमोर आणलेल्या आहेत. गणपती उत्सवात मै हूॕ डाॕन वर ठेका धरलेले तर कधी मुख्यमंञ्यांच्या स्वागताला ढोल वाजविणारे धस तर  शिवजयंती निमित्त लेझीम खेळणारे धस भजनी पथकासोबत फुगडी खेळण्याचा आनंद  लुटणारेही धस सर्वांनीच अनुभवले आहेत माञ सध्या आ.सुरेश धस यांचा आणि त्यांचे चिरंजीव जयदत्त धस यांचा कुस्तीचा डाव असणारा व्हिडिओ एक दिवसांपूर्वी व्हायरल झाला आणि आ.धस पुन्हा एकदा आपल्या वेगळ्या शैलीने कुस्तीच्या डावपेचाने चांगलेच चर्चिले जात आहेत.

भल्याभल्यांना राजकीय पटलावर चितपट करुन चाणक्यनितीचे अवलंबन करणारे आ.सुरेश धस हे ग्रामीण खेळातही वरचढ असल्याचे या माध्यमातून पुढे आले आहे.त्यामुळे त्यांचा आणि चिरंजीव जयदत्त धस यांचा कुस्तीचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.


No comments