Breaking News

संविधान दिनानिमित्त बसपातर्फे बाबासाहेबांच्या प्रतिमेसह संविधानाच्या प्रतींचे वाटप


बीड : संविधान दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सतिष कापसे यांनी  शिवाजीनगर पोलिस ठाण्यात व  बीड शहर पोलिस ठाण्यात भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा व भारतीय संविधानाची प्रत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे विभागीय अध्यक्ष वैभव स्वामीं यांच्या हस्ते देऊन भारतीय संविधान दिन गुरुवारी (दि.२६) साजरा करण्यात आला. 


यावेळी शहर पोलिस ठाण्याचे पोनि श्री. सानप, पत्रकार राजू जोगदंड, शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोनि एस. आर. ठोंबरे, औसरमल,  बहुजन समाज पार्टीचे पार्टीचे जिल्हा प्रभारी सतीश कापसे राहुल चव्हाण यांची उपस्थिती होती. 

भारतीय संविधान दिनानिमित्त बहुजन समाज पार्टीचे जिल्हा प्रभारी सतिष कापसे यांच्यासह कार्यकर्त्यांनी शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यास गुरुवारी (दि.२६) अभिवादन करुन पुष्पहार अर्पण करण्यात आले. यानंतर बसपाच्या वतीने घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह भारतीय संविधानाच्या प्रतीचे वाटप करण्यात आले. No comments