Breaking News

बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी पोकळेंना उमेदवारी द्यावी-रामराव खेडकर


 

शिरूर कासार : औरंगाबाद पदवीधर मतदार संघासाठी भाजपाने ईमादारीने सेवा करणाऱ्या रमेश पोकळे यांना उमेदवारी देऊन पदवीधर बेरोजगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी संधी द्यावी अशी मागणी तिंतरवणी गटाचे जिप सदस्य रामराव खेडकर यांनी केली आहे.

बहुगुणी, बहुआयामी, अष्टपैलू, व्यक्तीमत्व असलेले पोकळे हे प्रश्न कुठल्याही असो तातडीने हजर होऊन तो प्रश्न मार्गी लावतात जिल्ह्यात रमेश भाऊंनी भाजपचे जिल्हाध्यक्ष राहिलेल्या काळात सर्वसामांन्याची असंख्य कामे करून गोरगरिबांना दिलासा देण्याचे मोठे कार्य केले आहे.

विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी बाहेरून आलेल्या तब्बल जिल्ह्यातील ७८९ शिक्षकांना पंकजाताईं च्यामाध्यमातून बीडचे प्रशासन रूजू करून घेत नसताना जिल्ह्यातच मुळपदावर कायम ठेवण्याचे मोठे कार्य केलेले आहे.

रमेश पोकळे म्हणजे ओपन टु आँल नेतृत्व असुन त्यांच्या कार्यालयात कोणत्याही मानुस गेला तर प्रश्न साँल होतात असा अनुभव सर्वांना असुन अशा मानसातल्या मानसाला बेरोजगार पदवीधर व गोरगरिबांची सेवा करण्यासाठी पक्षाने उमेदवारी देऊन संधी द्यावी असेही खेडकर म्हणाले आहेत.No comments