Breaking News

बहिणीकडे भाऊबीज, थोरल्या भावाची सदिच्छा भेट व सासरवाडीला वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या "वसंत" वर काळाचा घाला


ऐन पाडवा व भाऊबीजेच्या दिवशी दगडे कुटूंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला 

भारत पानसंबळ । शिरुर कासार 

येथील रहिवासी सेवानिवृत्ती नंतर मुलांसह पुण्याला स्थाईक असलेल्या दगडे परिवारावर ऐन पाडवा व भाऊबीजेच्या दिवशीच दुखा:चा डोंगर कोसळला .बहिणीकडे भाऊबीज ,थोरल्या बंधुची सदिच्छा भेट व सासरवाडीला मंगळवारी वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या "वसंत" वर रस्त्यातच काळाने घाला घातला. 

सेवानिवृत्त ग्रामसेवक निवृत्ती गंगाराम दगडे यांचा तिस-या नंबरचा मुलगा वसंत हा आपल्या सहचारिणी सोबत पुणे येथुन स्वत:च्या चारचाकीत नगर येथील बहिणीकडे भाऊबीजीसाठी निघाले होते ,बहिणीकडून औक्षण करून घेतल्यानंतर औरंगाबाद येथे थोरले बंधु अशोक दगडे यांची भेट घेऊन जालन्याला सासडवाडीत आपला मंगळवारी वाढदिवस साजरा करण्यासाठी निघाले होते परंतू  त्यांना गाडीतच हृदय विकाराचा तीव्र  झटका आला आणि सारा प्लॅन क्षणात धुळीस मिळाला. वसंतचे वय यावेळी ५३ वर्ष ईतके होते. 

दिवाळीचा आनंद बहिण ,भाऊ ,तसेच सासरवाडीत एकत्रीत साजरा करायचा असे ठरले होते सारा परिवार वेगळ्या विश्वात होता ,सहचारिणी सोबतच होती ,आपल्या समोर जिवनसाथीला काळाने त्याच्या कवेत घेतले हे दु:ख पत्नी कसे सहन करणार ,आनंदाच्या उर्मी क्षणात मावळल्या आणि धाय मोकलुन हंबरडा फोडला ,आपल्या पतीला रस्त्यातच मृत्यूने गाठले ,हा शोक संदेश  देखील त्या दुर्दैवी पत्नीला आपल्या परिवाराला सांगण्याची वेळ आली .

दगडे परिवारातील वसंत  हा तीसरा मुलगा अनायासेच सर्वांचा लाडका होता सतत हास्यमुद्रा हे वसंतचे वैशिष्ट्य होते ,वयस्कर आई वडीलांना आपल्या डोळ्यासमोर मुलाची अंत्ययांत्रा असा दुर्धर प्रसंग आल्याने सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे. जागतीक कासार विचार मंच चे एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून वसंतचे थोरले बंधु अशोक दगडे शोक सागरात बुडाले तर दुसरा भाऊ डाॅक्टर लहाण भाऊ असा अनाहुतपणे जातोय या कल्पनेने खचुन गेला ,बहिणीला ऐन भाऊबीजेच्या दिवसी लाडक्या भाऊरायाला मुकावे लागले ,वसंतच्या दुर्दैवी मृत्यूची वार्ता शिरूरकासारला धडकताच दिवाळीचा आनंद मावळला .त्यांचेवर पुणा येथेच अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांचे पश्चात आई, वडील, भाऊ, भावजाई, पत्नी, मुलं, बहिणी असा मोठा परिवार आहे.

श्री कालिका देवी संस्थान शिरुर कासार तर्फे श्रध्दांजली 

येथील रहिवासी तथा सामाजीक कार्यात  अग्रेसर असलेल्या कुटूंबावर शोककळा पसरली त्यांच्या दु:खात सहभागी होत वसंत दगडे यांना कालिका देवी संस्थान शिरूरकासारतर्फे भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली त्यात संस्थानचे अध्यक्ष रोहीदास पाटील,सचिव बापुराव गाडेकर  यांचेसह सर्व विश्वस्थ व समाजबांधव सहभागी होते .

वसंतचा शेवटचा मोबाईल संदेश 

सोमवारी सकाळी ७.२० वाजता मोबाईल वर कन्यादान और रक्तदान आज के जमानेमे सर्वश्रेष्ठ है ,मगर आनेवाले समय में रिस्तो को बचाने के लीये वक्तदान आपनो के लिये सबसे किंमती दान होगा असा संदेश दिल्यानंतर अवघ्या दोन तासात वसंतने शेवटचा श्वास घेतला. 


No comments