Breaking News

तुलसी महाविद्यालयात भव्य रक्तदान शिबीर संपन्न

 


बीड : देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी संगणकशास्त्र व माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय बीड येथे दि.11 नोव्हेंबर 2020 रोजी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वतीने कोव्हिड महामारीच्या काळात कोणत्याही रुणाला रक्ताची कमतरता भासू नये या उद्देशाने या भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबीराचे उद्घाटक बीड जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक मा.डॉ. अशोक थोरात यांच्या हस्ते झाले.

    सदर रक्तदान शिबीराबाबत सोशल मिडीया मार्फत रक्तदान शिबीराची माहिती देण्यात आली. एकूण 100 इच्छिुकांनी नोंदणी केली. रक्तदान शिबीर येथे गर्दी होऊ नये म्हणून सोशल डिस्टटींग चे पालन करुन सर्व इच्छिुकांनी रक्तदान केले. सदर शिबीरादरम्यान प्रामुख्याने देवगिरी प्रतिष्ठान संस्थेचे अध्यक्ष मा. प्रा. प्रदिप रोडे , महाविद्यालयाचे प्राचार्य निकाळजे डी.जी. यांची प्रमुख उपस्थिती होती या रक्तदान शिबीरामध्ये 50 ते 60 विद्याथ्र्यांनी स्व:च्छेने रक्तदान करुन कोरोना महामारी सोबत संपूर्ण जग लढत असताना आपणही या लढ्यात सहभागी आहोत हे दाखवून दिले.

    यावेळी कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना महाविद्यालयाचे प्राचार्य निकाळजे डी.जी. यांनी रा.से. यो. योजनेच्या विविध उपक्रमाची माहिती दिली. तसेच रक्तदात्याचे आभार व्यक्त केले महाविद्यालयाच्या स्तुत्य उपक्रमाचे कौतूक केले. रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. असे सांगत इतरांनी ही रक्तदान करण्याचे आवाहन केले. 

    कार्यक्रमाच्या उद्घाटना प्रसंगी मा. अशोक थोरात साहेब यांनी कोरोना महामारीच्या काळात रक्ताची आवश्यकता असल्यामुळे रक्तदात्याने मोठ्या संख्येने पुढे येवून रक्तदान करावे असे आवाहन केले.तसेच रक्तदान केल्याने अनेकांचे प्राण वाचू शकते. अशा महामारीच्या काळात रक्तदात्याने रक्तदान करावे असा प्रेरणादायी संदेश दिला.

    सदर कार्यक्रमासाठी  जाधव नवनाथ ( लोकजगत संपादक), अनिल घोरड (दै. लोकमत प्रतिनिधी), भावत वौद्य (दै. युवतिराज ,संपादक), बालाजी जगतकर ( दै.दिव्य अग्नी), नितीन जोगदंड ( न्युज 9 मराठी) इ. पत्रकारांनी या रक्तदान शिबीरात सहभाग नोंदविला. महाविद्यालयातील प्राचार्य निकाळजे डी.जी.,प्रा. सुर्वे अंकुश, प्रा.जोगदंड विवेक, प्रा. सचिन झेंडे,प्रा.अंकुश कोरडे, मा. जाधव परशराम सह इत्यादी कर्मचा·यांनी रक्तदान केले. यावेळी महाविद्यालयतील  प्रा. योगिता लांडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. मिर्झा समिर, प्रा. शिल्पा बोराडे, पांचाळ बबन, भारत उघडे, किशोर वाघमारे, प्रविण रंगदळ,  सुनिता साळूंके, पाठक प्राची सह आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे परिश्रम घेतले.


No comments