Breaking News

आ. सुरेश धस यांच्या प्रयत्नाने बेलगाव मुर्शदपुर पाणीपुरवठा योजना झाली कार्यांन्वित

मुर्शदपुर कासारी शिदेवाडीत पथदिवे, नळाला पाणी दिपावलीच्या  अगोदर देऊन सरपंच अतुल कोठुळे यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा 


आष्टी :  शहराचा उपनगर म्हणून ओळखला जाणार्या मुर्शदपुर शहरांमध्ये गेल्या तीन वर्षापासून ग्रामपंचायत द्वारे देण्यात आलेल्या नळ कनेक्शन पाणीपुरवठा योजना अनेक कारणांनी बंद पडली होती. बेलगाव तलावावरील ट्रांसफार्मर जळाले होते. जागोजागी पाईपलाईन नादुरुस्त झाली होती. सरपंच अतुल कोठुळे व सर्व सदस्यांनी ही समस्यांची आ. सुरेश धस यांच्या बरोबर चर्चा करून आ.धस यांनी तात्काळ बेलगाव तलावावर ट्रांसफार्मर बसवण्याचे महावितरण अधिकाऱ्यांना सांगितल्याने या ठिकाणी तात्काळ ट्रांसफार्मर बसवण्यात आले.

सरपंच अतुल कोठुळे सर्व सदस्य गेल्या वीस-पंचवीस दिवसापासून बेलगाव ते मुर्शदपुर पाईपलाईन दुरुस्तीचे काम पूर्ण करून आज मुर्शदपुर शहरवासीयांना नळाद्वारे पाणी सोडण्यात आले.दिपावलीच्या अगोदर कासारी, मुर्शदपुर, शिदेवाडी, धनवडे वस्ती, वारंगुळे वस्ती, धुमाळ वस्ती, दिंगबरनगर, पारधीवस्ती याठिकाणी विद्युत पथदिवे बसविण्यात आलेलेे आहैत. हे पथदिवे बसविण्याचे काम सुरू असतानाच मुख्य पाणीपुरवठा यासाठी गेल्या महिनाभरात काम सुरू होते. मुर्शदपुर शहराला गेल्या तीन वर्षापासून पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर निर्माण झाली होती.

त्याचबरोबर सतत दुष्काळ असल्याने बेलगाव मुर्शदपुर ही पाईपलाईन बंद पडल्याने अनेक ठिकाणी नादुरुस्त झाली या वर्षी भरपूर पाऊस झाल्याने बेलगाव साठवण तलाव मध्ये पाणीसाठा उपलब्ध झाला आणि या गंभीर समस्येकडे आमदार सुरेश धस यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच अतुल कोठुळे व सर्व सदस्यांनी लक्ष देऊन गेल्या 25 दिवसांपासून जवळपास चाळीस, पंचेचाळीस ठिकाणी तुटलेली पाईपलाईन दुरुस्त केली .या ठिकाणचे विद्युत कनेक्शन साठी नवीन ट्रांसफार्मर बसवण्यात आले ..विद्युत पाणी पंप ,विद्युत कनेक्शन पंप हाऊस ,ठिकठिकाणी एअर वाँल बसून आज दिनांक 12 नोव्हेंबर रोजी ही योजना पूर्ण होऊन मुर्शदपुर शहरातील नागरिकांना प्रत्यक्षात पाणी  मिळाल्याने आ.सुरेश धस , ग्रामपंचायतचे सरपंच अतुल कोठुळे ,उपसरपंच सागर धोंडे व सर्व सदस्य, कर्मचाऱ्यांचे कासारी,मुर्शदपुर ,शिदेवाडी ग्रामस्थांच्यावतीने अभिनंदन होत आहे.

No comments